Urine colour chart and its meaning: तुमचं शरीर निरोगी असेल तरंच तुम्ही तुमची दैनंदिन कामं उत्तम पद्धतीने आणि उत्साहाने करू शकतात. तुम्ही आजारी पडायच्या आधी किंवा तुमच्या शरीरात जेंव्हा अंतर्गत बदल होत असतात तेंव्हा तुमचं शरीर तुम्हाला विविध संकेतही देतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही संकेतांबाबत सांगणार आहोत ज्याच्या आधारे तुम्हाला तुम्ही निरोगी आहात की नाही हे समजू शकेल. या बातमीत तुम्हाला तुमच्या युरिनच्या रंगांबाबत सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या शरीराबाबत माहिती समजू शकेल.
हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या माहितीनुसार अनेकदा आपल्याला असणाऱ्या व्याधींमुळे, किंवा आपण घेत असलेल्या औषधांमुळे आपल्या युरिनचा रंग बदलतो. डॉक्टरांच्या माहितीनुसार युरिनचा रंग हा ट्रान्सपरंट आणि हलक्या पिवळ्या रंगाचा असतो. मात्र तुम्ही अगदी क्लिअर युरीन पास करत असाल तर तुम्ही पाण्याचं अतिसेवन करत आहात असं डॉक्टर सांगतात.
सकाळी उठल्याउठल्या तुम्ही पहिल्यांदा जेंव्हा युरीन पास करतात तेंव्हा रंग गडद पिवळा असतो. याचाच अर्थ तुमच्या शरीरातून सर्व विषारी पदार्थ फेकले जात आहेत. मात्र सकाळी तुम्ही पास करत असलेली युरीन एकदम क्लिअर असेल तर मात्र तुम्ही पाण्याचं अतिसेवन करत आहात असं डॉक्टर सांगतात. जर तसं होत असेल तर तुमच्या इलेक्ट्रोलाईट लेव्हलवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
मद्यसेवनामुळे तुमच्या लिव्हरवर ड्यूरेटिक इफेक्ट पाहायला मिळतो. यामुळे शरीरात जास्त प्रमाणात युरीन तयार होते. यामुळे तुम्हाला वारंवार वॉशरूमला जावं लागतं आणि तुमच्या युरीनचा रंग क्लिअर दिसतो.
सर्वसाधारणपणे एक प्रौढ व्यक्ती दिवसात साधारणतः 2.5 लिटर युरीन पास करतो. मात्र हे प्रमाण तुमच्या पाणी पिण्याच्या सवयीमुळे कमी किंवा जास्त होऊ शकतं. तुमच्या शरीरातील कॅल्शियमच्या प्रमाणावर तुम्हाला जास्त युरीन पास करावी करावं शकते. सोबतच तुम्हाला क्लिअर युरिनची समस्येचा सामना करावा लागू शकतो.
हलका पिवळा रंग ( pale yellow urine colour) - जर तुमच्या लघवीचा रंग हलका पिवळा असेल, तर तुमचं शरीर हायड्रेटेड आहे असं समजा.
डार्क पिवळा (dark yellow urine colour) - जर तुमच्या लघवीचा रंग डार्क पिवळा असेल तर तुम्हाला डिहायड्रेशन झालं आहे असं म्हणता येईल. अशात तुम्ही जास्त पाणी प्यायला हवं.
युनीव्हर्सीटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या आरोग्य विभागाच्या अभ्यासानुसार ऑरेंज रंगाच्या युरिनमध्येही तीन प्रकार असतात. हलका ऑरेंज रंग हा तुमच्या शरीरात डिहायड्रेशनची सुरुवात असल्याचं सांगतो. लिव्हर संबंधित आजारांमुळेही तुमच्या युरीनचा रंग हलका ऑरेंज पाहायला मिळू शकतो. तुम्ही जर काही विशिष्ठ औषधं घेत असाल तर तुमच्या युरीन चारंग डार्क ऑरेंज ( dark orange urine colour) किंवा ब्राऊन पाहायला मिळू शकतो. ऑरेंज किंवा ब्राऊन रंग हा शरीरातील डिहायड्रेशन किंवा काविळीबाबत माहिती देत असतो
गुलाबी किंवा लाल रंगाची युरीन ( red or pink yellow urine colour ) : आपल्या जेवणात काही अशा गोष्टी येत असतात ज्याच्या सेवनामुळे तुमच्या युरीनचा रंग बदलू शकतो. उदाहरणार्थ तुम्ही बीट ज्यूस पित असाल तर तुमच्या युरिनचा रंग डार्क लाल असू शकतो. मात्र,तुमच्या युरीनचा रंग लाल किंवा गुलाबी नसेल तर तुमच्या युरिनमध्ये रक्त आहे का हे डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेणं गरजेचं आहे.
निळा आणि हिरवा रंग ( blue or green urine colour) - तुमच्या युरिनचा रंग जर निळा किंवा हिरवा असेल तर तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम युरीनच्या रंगावर झालेला पाहायला मिळतो.
युरीनचा ढगाळ पांढरा ( off white urine colour) रंग हा महिलांमधील वजायनल इन्फेक्शन किंवा व्हाईट डिस्चार्जमुळे आलेला असू शकतो.
( विशेष नोंद - वरील माहिती हि सर्वसामान्य डायनानावर आधारित आहे. याचा सर्वसामान्य आयुष्यात वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )
urine colour and its meaning for both male and female read all colour chart