ठाणे रिंग मेट्रो रेल्वे 2029 पर्यंत धावणार? प्रकल्पाबाबत सरकारचा मोठा निर्णय

लवकरच ठाणेकरांची वाहतूक कोंडूतून सुटका होणार आहे. ठाणे रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 30, 2024, 03:44 PM IST
ठाणे रिंग मेट्रो रेल्वे 2029 पर्यंत धावणार? प्रकल्पाबाबत सरकारचा मोठा निर्णय title=

Thane Ring Metro : ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती मिळणार आहे. ठाणे रिंग मेट्रो रेल्वेच्या 12 हजार 220  कोटींच्या सुधारित आराखड्यास कॅबिनेट बैठकीत मान्यता देण्यात आली.  रिंग मेट्रो प्रकल्पामुळे ठाणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. 

ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी या साठी आवश्यक 12 हजार 220 कोटी 10 लाख रुपयांच्या सुधारित आराखड्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक पार पडली.  या मेट्रो रेल्वे मार्गाची लांबी 29 किलोमीटर इतकी आहे. या मार्गावर 20 उन्नत स्थानके आणि दोन भुमिगत स्थानके आहेत.

असा आहे ठाणे रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प

तब्बल 12हजार200 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असणार आहे.  29 किमीचा हा मेट्रो मार्ग असेल. या मार्गावर 15 स्थानकं असतील. ठाणे मेट्रोचा काही भाग भुयारी असणार आहे. यामुळे ठाण्यातील नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत यासारखे महत्त्वाचे भाग मेट्रोने जोडले जाणार आहेत.

हे देखील वाचा... खंडाळा घाटात 180 मीटर उंच स्टेड पुल; एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याला जोडणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पासंदर्भात मोठी अपडेट

येत्या चार वर्षांत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे. नियोजीन वेळेस काम पूर्ण झाल्यास 2029 पर्यंत ठाणे  रिंग मेट्रो ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल. ठाण्यातील नागरिक वाहतूक कोंडीने हैराण आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीने हैराण नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. 

भुयारी मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज  पुण्यातील भुयारी मेट्रोचं उदघाटन करण्यात आलं.. ऑनलाईन पध्दतीन नरेंद्र मोदींनी या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे यावेळी उपस्थित होते.. मेट्रोच्या उदघाटनानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील भुयारी मेट्रोतून प्रवासही केला.. त्यानंतर दुपारी 4 वाजल्यापासून जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रोचा भुयारी मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला... दरम्यान पुणे मेट्रोसोबत पंतप्रधानांनी सोलापूर विमानतळाचंही उदघाटन केलं..