Rajesh Kumar : 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेता राजेश कुमारनं कायम त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, राजेशनं अचानक करियरच्या यशाच्या शिखरावर असताना अचानक शोबिज सोडून शेतीचं काम सुरु केलं होतं. राजेश कुमार शार्क टॅंक इंडिया शोसाठी गेले होते. त्यावेळी त्या शोमधले दोन राऊंड पार केल्यानंतर त्याला पुढच्या राऊंडसाठी बोलावण्यात आलं नाही. अभिनय सोडून शेती सुरु केल्याच्या काही वर्षांनंतर त्याला या शोसाठी बोलावण्यात आलं होतं.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राजेश कुमारनं यावेळेविषयी सांगितलं की जेव्हा त्याच्याकडे कोणता चित्रपट नव्हता आणि तो प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करतो. यासगळ्यात तो 'शार्क टॅंक इंडिया' मध्ये देखील गेला होता. राजेशनं सांगितलं की मी शार्क टॅंक इंडियासाठी बोलावण्यात आलं होतं. मी तीनपैकी दोन राऊंड क्लियर केले होते. मला माझे व्हिडीओ सबमिट करायचे होते. त्यामुळे मी विचार केला की मला मदत मिळू शकते कारण मी लोकप्रिय आहे.
त्यानं पुढे सांगितलं की मी एक अभिनेता आहे, जो शेती करतो. जो एक बिझनेसमॅन आहे आणि जो शेतीविषयी बोलतो. मला शोसाठी कोलकाना जायचं होतं आणि माझं ऑडिशन एका दिवसात पूर्ण झालं. माझ्या वडिलांनी मला तिकिटाचे पैसे दिले होते.
राजेशनं पुढे सांगितलं की शार्क टॅंक इंडियासाठी जाण्याआधी, मला हड्डी चित्रपटांसाठी फोन आला आणि त्यांना मला भेटायचं होतं. माझा आत्मविश्वास तेव्हा इतका डगमगला होता की जेव्हा मी कास्टिंग दिग्दर्शकाशी भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तर त्यांनी मला सांगितलं की ऑडिशन होणार नाही. मी विचार केला की ते माझं ऑडिशन घेणार, मग त्यांनी सांगितलं की प्रोडक्शनसाठी लोकं सरळ पैशांविषयी बोलतात, मला याविषयी जरा बरं वाटत होतं की त्यानंतर माझं ऑडिशन होणार. मग त्यांनी सांगितलं की 'सर, तुम्ही कन्फर्म आहेत.'
दरम्यान, त्या आधी त्याला जेव्हा सहकलाकारांच्या भूमिका मिळत होत्या. तेव्हा त्याला ही जाणीव झाली की अभिनेता म्हणून त्यानं काम केलं, पण व्यक्ती म्हणून त्यानं निसर्गासाठी काय केलं? तेव्हा त्यानं सांगितलं की त्यानं शेतीसाठी काम करण्यास सुरुवात केली आणि पूर आला होता. त्यामुळे त्याचं शेतात खूप नुकसान झालं. त्यानं मग 1500 झाडं लावली, पण त्यानंतर शेतात आग लागली आणि त्यात 70 टक्के शेत जळून खाक झालं.
हेही वाचा : 32 कोटींना मुंबईतला बंगला विकल्यानंतर कंगनाचा 'कार'नामा! नव्या गाडीची किंमत ऐकून बसेल धक्का
पुढे राजेशनं सांगितलं की "त्यानं विचार केला की तो लोकांच्या डिमांडवर त्यांच्यासाठी भाज्यांची शेती करणार आणि ते त्यांना देणार. त्यांनी त्यांच्या मित्रांना याविषयी सांगितलं. पण कोणी त्यांची मदत केली नाही. त्यानंतर मी माझ्या मुलाच्या शाळेच्या बाहेर भाज्या विकण्यास सुरुवात केली. लोकांना वाटत होतं की राजेश पागल झाला आहे आणि हा भाज्या का विकत आहे. त्यावेळी माझा मुलगा तिसरीत शिकत होता. मला भाजी विकताना पाहून माझा मुलगा सगळ्या शिक्षकांना माझ्याकडून भाजी खरेदी करण्यास सांगत होता. माझ्या मुलाची सगळे मित्र देखील शाळेत सगळ्यांना सांगायचे की वियानचे वडील हे शाळेच्या बाहेर भाजी विकतात. हे सगळं सांगत राजेश भावूक झाला. त्याचे डोळे पाणावले, मी हा विचार करत गेलो होतो की मी छोटं काम करत नाहीये. भाजी विकणं हे छोटं काम नाही, कारण खूप काही संपवल्यानंतर मी हे काम करत होतो. मुलांना ही जाणीव झाली की हे छोटं काम नाही."