याला म्हणतात न्याय! पोलिसांकडून दोन गुंडांचा 'ऑन द स्पॉट' निकाल, Video होतोय तुफान व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन गुंडांकडून रस्त्यावरुन जाणाऱ्या एका माणसाला लूटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे. त्याचवेळी आलेल्या पोलिसांनी गुंडांचा जागेवरच निकाल केला.

राजीव कासले | Updated: Sep 30, 2024, 04:23 PM IST
याला म्हणतात न्याय! पोलिसांकडून दोन गुंडांचा 'ऑन द स्पॉट' निकाल,  Video होतोय तुफान व्हायरल title=

Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडिओ विसरुन जातो, तर काही व्हिडिओ कायमचे लक्षात रहातात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्स पोलिसांच्या शौर्याचं कौतुक करत असून यालाच न्याय म्हणतात अशा प्रतिक्रिया देत आहेत. असे पोलीस असतील तर गुन्हेगारी आपोआप कमी होईल अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत. या व्हिडिओत दोन गुंडांकडून रस्त्यावरुन जाणाऱ्या एका माणसाला लूटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे. त्याचवेळी आलेल्या पोलिसांनी गुंडांचा जागेवरच निकाल केल्याचं पाहायला मिळतंय.

काय आहे व्हायरल व्हिडिओत?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक व्यक्ती रात्रीच्या सुमारास रस्त्याने जाताना दिसत आहे. रस्त्यावर या व्यक्तीशिवाय कोणीच दिसत नाही. त्याचवेळी बाईकवरुन दोनजण या व्यक्तीच्या बाजूने निघून जाताना दिसतायत. रस्त्यावर कोण नसल्याचं पाहून हे दोघंही युटर्न घेऊन बाईक रस्त्यावरुन चालणाऱ्या व्यक्तीच्या जवळ येऊन थांबवतात. आरोपी चाकूचा धाक दाखवून त्या व्यक्तीच्या पाठिवरची बॅग हिसकावून घेतात आणि बाईकवर बसून पसार होणार तितक्यात पोलिसांची बाईक येताना दिसतेय.

पोलीस येत असल्याचं दिसतात व्यक्ती आरोपींच्या बाईकला धक्का मारतो. त्यामुळे आरोपी बाईकसह रस्त्यावर कोसळतात. पोलीस आल्याचं पाहाताच आरोपी उठून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. पण पोलीस क्षणांचाही विलंब न लावता दोघांवरही गोळ्या झाडतो.

गोळीबारात दोन्ही आरोपी ठार

व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे काही अंतर पळाल्यानंतर दोन्ही आरोपी रस्त्यावर पडलेले दिसतायत. पोलिसाने केलेल्या गोळीबारात दोन्ही आरोपी रस्त्यावर निपचित पडतात. व्हायरल होणाारा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची माहिती नाही. व्हिडिओच्या आधारे ही बातमी बनवण्यात आली आहे. हा व्हिडिओ एका युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्यात.

युजर्सकडून पोलिसाचं कौतुक

व्हायरल होणाऱ्या हा व्हिडिओ पाहून लोकांनी त्या पोलिसाचं कौतुक केलं आहे. असे पोलीस असतील गुन्हेगारीचा आलेख निश्चित कमी होईल, असं एका युजर्सने म्हटलं आहे. तर एका युजरने आजच्या काळात अशा पोलिसांनी नितांत गरज असल्याचं म्हटलं आहे.