मुंबई : जर तुम्हाला सगळ्याच आजारांपासून दूर राहायचे असेल तर व्हिटॅमिन बी-12 (Vitamin B12) शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो. आपल्या रक्तातील लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी देखील व्हिटॅमिन बी-12 देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी-12 डीएनए तयार करण्यास आणि फॉलिक ऍसिड शोषण्यास मदत करते. व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता तुमच्या शरीरात लाल रक्तपेशींचे उत्पादन कमी करते, ज्यामुळे अशक्तपणाचा धोका वाढतो. व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे अनेक मोठ्या आजारांचा धोकाही वाढतो.
व्हिटॅमिन बी -12 च्या कमतरतेची काय काय लक्षणं आहेत ते जाणून घ्या
- त्वचा पिवळसर होणे
- जिभेवर पुरळ येणे किंवा लालसर होणे
- तोंडाच्या अल्सरची समस्या
- दृष्टी कमी होणे
- नैराश्य, अशक्तपणा आणि सुस्ती
- दम लागणे
- डोकेदुखी आणि कान दुखणे
- भूक न लागणे
1- स्मृतिभ्रंश (गोष्टी विसरणे) - व्हिटॅमिन बी-12 च्या (Vitamin B12) कमतरतेमुळे विस्मरण आणि भ्रम यांसारखे मानसिक आजार देखील होतात. अनेक वेळा लोक या समस्यांना गांभीर्याने घेत नाहीत, परंतु जर तुम्हाला अशी लक्षणे वारंवार जाणवत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
2- मज्जासंस्थेला नुकसान - व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे मज्जासंस्थेवरही वाईट परिणाम होतो. यामुळे मज्जासंस्थेचे नुकसान होते. कधी कधी या समस्येला आयुष्यभर सामोरे जावे लागते.
3- गर्भपात आणि जन्मादरम्यान समस्या- अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे गर्भपात, बाळाचा योग्य विकास आणि जन्मादरम्यान होणाऱ्या समस्यांमुळे गर्भवती महिलांमध्ये समस्या अधिक वाढतात. ज्या स्त्रिया बाळाला दूध पाजतात त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असू शकते.
4- अॅनिमिया- जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असेल तर ते लाल रक्त पेशींचे उत्पादन कमी करते. अशा स्थितीत तुम्हाला अॅनिमियाचा धोका असू शकतो. त्याचा वेळीच शोध लागला नाहीतर, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
5- त्वचा संक्रमण- व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. यामुळे त्वचे संक्रमण, जखमा भरण्यास उशीर होणे, केस गळणे आणि नखांच्या समस्या उद्भवू शकतात.
6 - पोटाचा विकार - व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे क्रोहन रोगासारखे पोटाशी संबंधित आजार देखील होऊ शकतात. याशिवाय व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे पचन, बद्धकोष्ठता आदी समस्याही उद्भवू शकतात.
(सूचना: दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.)