समोरच्याला पाहून आपल्याला जांभई का येते? झोपेमुळे नाही तर यामागील कारण काही वेगळंच

Why do we Yawn : इतरांना पाहून आपल्याला जांभई का येते?

Updated: Jan 3, 2022, 01:36 PM IST
समोरच्याला पाहून आपल्याला जांभई का येते? झोपेमुळे नाही तर यामागील कारण काही वेगळंच title=

मुंबई : तुम्ही ही गोष्ट बहुतेकदा पाहिली असेल किंवा त्याचा अनुभव देखील घेतला असेल की, जेव्हा समोरील व्यक्ती जांभई देतो तेव्हा त्याला पाहून दुसऱ्या व्यक्तीलाही जांभई येते. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की असं का घडतं? दुसऱ्या व्यक्तीला सुस्तावलेले पाहून तुम्हाला कंटाळवाणे का वाटते? खरेतर या मागे एक विज्ञान आहे. यावर प्रिन्स्टन विद्यापीठाने संशोधन केलं आहे. याचा संबंधं झोपेशी नाही असे या विद्यापिठाने यामध्ये म्हटले आहे.

मग आपल्याला जांभई का येते आणि इतरांना पाहून आपल्याला जांभई का येते? यामागचं कारण समजून घ्या (Why do we Yawn)

जांभई का येते? (Why do we Yawn)

प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या अहवालात असे म्हटले आहे की, जांभईचा मेंदूशी संबंध आहे. मेंदू स्वतःला थंड ठेवण्यासाठी हे करतो. जेव्हा बाहेरचे तापमान जास्त असते तेव्हा शरीराचे तापमान कमी होते. त्याच वेळी, हिवाळ्यात शरीराचे तापमान बाहेरील तापमानापेक्षा जास्त असते. म्हणजेच जर बाहेर थंडी असेल तर तुमचं शरीर तुम्हाला गरम वाटतं आणि बाहेरील वातावरण गरम असेल तर तुमचं शरीर थंड राहतं. असं करत असताना तुमचा मेंदू अधिक ऑक्सिजन आपल्याकडे ओढून घेतं आणि त्याचं तापमान नियंत्रित करतो.

जांभई येण्याचाही संबंध हवामानाशी असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, जांभई का येते (Why do we Yawn) हे समजून घेण्यासाठी त्यांनी एकूण 180 लोकांवर संशोधन केलं. यामध्ये उन्हाळ्यात 80 तर हिवाळ्यात 80 जणांचा समावेश करण्यात आला. यावरील संशोधन अहवालाची तुलना केली असता असे आढळून आले की, उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात जास्त लोक जांभई देतात.

समोरच्या व्यक्ताला पाहून जांभई का येते? (Why do we Yawn)

2004 मध्ये केलेल्या एका संशोधनानुसार, समोरच्या व्यक्तीला असे करताना पाहून 50 टक्के लोकांना जांभई येऊ लागते. इतरांना पाहिल्यानंतर माणसे का जांभई देतात हे समजून घेण्यासाठी म्युनिकच्या सायकियाट्रिक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलने 300 लोकांवर संशोधन केले. संशोधनात सहभागी असलेल्या लोकांना जांभई देतानाचे व्हिडीओ दाखवण्यात आले. यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या.

संशोधन अहवाल सांगतो, व्हिडीओ पाहताना लोकांना 1 ते 15 वेळा जांभई आली. संशोधकांचे म्हणणे आहे की, जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला जांभई देताना पाहते तेव्हा त्याची मिरर न्यूरॉन प्रणाली सक्रिय होते. त्याचा थेट संबंध मानवी मेंदूशी आहे. जेव्हा मिरर न्यूरॉन सिस्टम सक्रिय होते, तेव्हा ते मानवांना इतरांचे अनुकरण करण्यास प्रवृत्त करते.

तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, आपण दैनंदिन जीवनात नकळत बहुतेक लोकांच्या ऍक्शन किंवा काही गोष्टींना कॉपी करतो. त्यामुळे समोरच्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही जांभई येते.

परंतु हे देखील लक्षात घ्या की, आपल्या जवळच्या व्यक्तीने किंवा आपल्या ओळखीच्या वक्तीच्या प्रतिक्रियांचा आपल्यावर जास्त परिणाम होतो. म्हणून जेव्हा आपल्या ओळखीची व्यक्ती जेव्हा जांभई देते तेव्हा आपल्याला लगेच जांभई येते. परंतु आपल्या अनोळखी व्यक्ती जेव्हा असं करते तेव्हा त्याचा फार कमी लोकांवर परिणाम होतो.