कोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे? चालण्याचा योग्य वेग काय असावा? पाहा संशोधन काय सांगते

Walking for good health: वजन कमी करायचं? मग काय करावं लागलं? असं विचारल्यानंतर अनेकजण दररोज चालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहितीय का? दररोज चालण्यासाठी पण योग्य वेग आहे.  तसेच कोणत्या वयातील लोकांनी किती चालावे ते पाहा...

श्वेता चव्हाण | Updated: Apr 17, 2024, 02:39 PM IST
कोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे? चालण्याचा योग्य वेग काय असावा? पाहा संशोधन काय सांगते title=

Walking for good health in Marathi: चालणे हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे असं म्हटलं जाते. दिवसभरात भरपूर चालल्याने आपल्या सर्वांगाचा व्यायाम होतो. चालण हे निरोगी शरीर आणि मनासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. योग्य पद्धतीने चालण्याचा व्यायाम केल्यास आपल्या शरीराची चयापचयाची क्षमता  पण सुरळीत सुरु राहते. दररोज जितका वेळ आपण चालतो तितक्या जलद गतीने  कॅलरी घटवण्यास मदत मिळते. शरीर फिट ठेवण्यासाठी हा सोपा व्यायाम प्रकार मानला जाते. चालण्याचे फायदे तर आपल्याला सगळ्यांनाच माहित परंतु नेमकं कोणत्या वयातील लोकांना प्रत्येक दिवशी किती चालावे, याची योग्य माहिती सगळ्यांनात असतेच असे नाही. 

दरम्यान स्वीडनच्या कालमार विद्यापीठातीलस संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असं म्हटलं की, जर एखाद्या व्यक्तीने वय लक्षात घेऊन चालले तर ते केवळ वाढत्या वजनावरच नियंत्रण ठेवू शकत नाही, तर जीवनशैलीशी संबंधित इतर अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. याचबरोबर हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब असे अनेक गंभीर आजार सहज आटोक्यात ठेवू शकता.  

वयानुसार दररोज किती चालावे?

वय 6 ते 17
मुले - 15,000 पावले
मुली - 12,000 पावले

वय 18 ते 40
यांनी 12,000 पावले चालणे आवश्यक आहे 

 वय 40 ते 49
यांनी दररोज 11,000 पावले चालणे आवश्यक आहे 

वय 50 ते 59
या लोकांनी 11,000 पावले चालणे आवश्यक आहे 

* वय 60 व त्यापेक्षा अधिक
60 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना दररोज 8,000 पावले चालणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या गरजेनुसार किमान चाली ठेवू शकता.

दररोज किती वेगाने चालावे?

किमान 100 पावले प्रतिमिनिट किंवा 4 ते 5 किलोमीटर प्रतितास चालणे शरीरासाठी आरोग्यदायी आहे. मात्र हे वय, फिटनेसची पातळी, आणि एकूण आरोग्य यांसारख्या घटकांवर अवलंबून असते.  तसेच तुम्ही जितक्या वेगाने चालाल, तितके वजन कमी करणे तुमच्यासाठी सोपे होते. वजन कमी करण्यासाठी दररोज 5 ते 10 हजार पावले चालण्याचे ध्येय ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.