Weight Loss : आता सकाळी ब्रश करतानाही तुम्ही करू शकता Belly Fat कमी, कसं पहा...

व्यायाम करायला वेळ नाही, अवेळी खाणं यामुळे वजन कमी होण्याचं नाव घेत नाही.

Updated: Jul 22, 2022, 06:49 AM IST
Weight Loss : आता सकाळी ब्रश करतानाही तुम्ही करू शकता Belly Fat कमी, कसं पहा... title=

मुंबई : सध्या प्रत्येकाचं आयुष्य हे धकाधकीचं आणि धावळीचं झालंय. अशातच वजन वाढणं ही अनेकांनी समस्या आहे. व्यायाम करायला वेळ नाही, अवेळी खाणं यामुळे वजन कमी होण्याचं नाव घेत नाही. शारीरिक हालचाल होत नसल्याने वजन वाढणं, शुगर, हायपरटेन्शन सारख्या आजारही मागे लागतात.  

वजन कमी व्हावं यासाठी लोकं विविध उपाय करतात. कोणी व्यायाम करतं, कोणी रनिंग तर कोणी योगा. इतकंच नाही तर काही लोक गोळ्यांचा वापरही करतात. मात्र या उपायांमुळे रिझल्ट्स मिळतीलच याची खात्री नसते. पण आज तुम्हाला आम्ही काही व्यायाम सांगणार आहोत ते तुम्ही सकाळी दात घासतानाही करतानाही करू शकता. यामुळे तुम्ही वजन कमी करू शकता. 

लंजेज

लंजेज हा व्यायाम प्रकारही तुम्ही सकाळी दात घासताना करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ पाच मिनिटं द्यावी लागतील. लंजेजमुळे पोट आणि मांडी यांच्यातील फॅट कमी होतं. तुम्ही हा व्यायाम करून शरीरातील फॅट कमी करू शकता.

सिटअप्स

सकाळी ब्रश करताना तुम्ही हा व्यायाम तुम्ही करू शकता. केवळ पाच मिनिटांनी हा व्यायाम सुरू करू शकता त्यामुळे वजन कमी होण्यास चांगली मदत होईल. यामुळे पोटावरील चरबी म्हणजेच बेली फॅट कमी होऊ शकतं.

साइड स्ट्रेच

साईड स्ट्रेचमुळे हातावर जमा झालेली चरबी कमी होते. हे सर्व व्यायाम केल्यास तुमच्या शरीरात जमा झालेलं फॅट लवकर कमी करू शकता. हे व्यायाम फार सोपे असून तुम्ही घरच्या घरी करू शकता.