वजन कमी करण्यासाठी केळी खाता? कॅलरीच्या हिशोबाने 1 केळं म्हणजे किती चपात्या?

Weight Loss Tips: लठ्ठपणा हा अनेक आजारांना जन्म देतो, त्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्याची गरज असते. त्यामुळे आज अनेक जण वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात केळी खातात आणि दुपारच्या जेवणात चपात्या खातात. अशात शरीरातील कॅलरीज कमी होत नाही आणि वजनही कमी होत नाही. त्यामुळे कॅलरीच्या हिशोबाने 1 केळी म्हणजे किती चपात्या? हे तुम्हाला माहितीय का?

नेहा चौधरी | Updated: May 20, 2024, 11:44 AM IST
वजन कमी करण्यासाठी केळी खाता? कॅलरीच्या हिशोबाने 1 केळं म्हणजे किती चपात्या? title=
Eating bananas to lose weight How many chapatis is 1 banana in terms of calories

Weight Loss Tips: आजकाल प्रत्येक जण आपल्या आरोग्याबद्दल जागृत आहे. गेल्या काही वर्षांपासून लठ्ठपणा हा अनेक आजारांना कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे योग, जीम आणि डॉन्स करुन वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी इथे प्रत्येक जण काही ना काही करतोय. अगदी हेल्दी आणि पौष्टिक आहारावर भर देतात. अनेक जण नाश्तात केळीचं सेवन करतात. तर दुपारच्या जेवणात चपात्याही खातात. याचा परिणाम त्यांच्या शरीरातील कॅलरीज कमी होताना दिसत नाही. तुम्हाला केळं आणि चपात्या यामध्ये किती कॅलरीज असतात हे ठाऊकू आहे का? या दोघं एकत्र सेवन केल्यामुळे वजनावर परिणाम होतो का? कॅलरीच्या हिशोबाने 1 केळं म्हणजे किती चपात्या? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. (Eating bananas to lose weight How many chapatis is 1 banana in terms of calories)

वजन कमी करण्यासाठी काय करावं?

वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी अनेकजण धान्य खाणे बंद करुन फळांवर जोर देतात. पण तुम्हाला माहिती आहे का की अनेक फळांमध्ये खूप कॅलरीज असतात. म्हणजेच जर तुम्ही कॅलरीजयुक्त फळांचं सेवन केल्यास वजन कमी होण्याऐवजी ते वाढतं. त्यात जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी केळाचं सेवन करत आहात आणि चपात्याही खात आहात तर आधी त्यामध्ये किती कॅलरीज असतात ते जाणून घ्या. 

हेसुद्धा वाचा - Health : पती-पत्नीचा रक्तगट एकच नसावा, त्याचा खरंच गर्भधारणेवर परिणाम होतो? आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात...

कॅलरीच्या हिशोबाने 1 केळं म्हणजे किती चपात्या?

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, 1 केळी खाऊन तुमचं वजन कमी होत असेल तर तुम्ही केळी ऐवजी 1 चपाती खाऊ शकता. या दोन्हीमध्ये समान कॅलरीज आणि कर्बोदके आढळतात. एका महिलेने दिवसातून चार चपात्या खाल्ल्यात तर पुरुषांसाठी 6 चपात्या पुरेशा आहेत.

केळीच्या आकारानुसार किती कॅलरीज असतात?

अतिरिक्त लहान आकाराची केळी (6 इंच किंवा 81 ग्रॅमपेक्षा लहान) - 72 कॅलरी
लहान आकाराची केळी (6-7 इंच किंवा 101 ग्रॅम केळी) - 90 कॅलरी
मध्यम आकाराची केळी (7-8 इंच किंवा 118 ग्रॅम केळी)- 105 कॅलरी
मोठ्या आकाराची केळी (8-9 इंच किंवा 1136 ग्रॅम केळी) - 121 कॅलरी
अतिरिक्त मोठी केळी (9 इंच किंवा त्याहून मोठी, किंवा 152 ग्रॅम) - 135 कॅलरी
केळीचे काप (1 कप किंवा 150 ग्रॅम) - 134 कॅलरीज
मॅश केलेले केळी (1 कप किंवा 225 ग्रॅम केळी) - 200 कॅलरीज

केळीचं कॅलरीचं गणित

केळीच्या कॅलरीज नेहमी त्याच्या आकारावर अवलंबून असून 1 केळीमध्ये सरासरी 100 कॅलरीज आढळतात. खरं तर, केळीमध्ये मिळणाऱ्या 100 कॅलरीजपैकी 93% कर्बोदकांमधे, 4% प्रथिने आणि 3% फॅट असतात. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)