वेट लॉस व फॅट लॉसमध्ये काय फरक आहे; वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करावं?

Weight Loss And Fat Loss: लठ्ठपणा कमी करण्यासाठी नेमकं काय करावं, कसं डाएट घ्यावे, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील? तर ही बातमी नक्की वाचा 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 4, 2023, 01:34 PM IST
वेट लॉस व फॅट लॉसमध्ये काय फरक आहे; वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करावं? title=
What is the difference between weight loss and fat loss

Weight Loss And Fat Loss: आजच्या काळात लठ्ठपणा ही एक तीव्र समस्या होऊन बसली आहे. वेळी- अवेळी खाणे आणि बदलती जीवनशैली यामुळं अनेकांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. तसंच, ऑफिसमध्ये एकाच जागी बसून बसूनही शरीरातील चरबी म्हणजे फॅट वाढते. लठ्ठपणा वाढल्यामुळं अनेक आजारांचा धोकाही वाढतो. आजारांचा धोका कमी करण्यासाठी लोक वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाय नव नवीन उपाय करतात. जीम, योगा, डायट असे प्रकार करुन बघतात. मात्र, शरीराला निरोगी ठेवण्यासाठी एक हेल्दी वेट मेंटेन करणे गरजेचे आहे. त्यामुळं हेल्दी वेट मेंटेन करण्यासाठी वेट लॉस करावे की फॅट लॉस करावे, हे नक्की कळालं पाहिजे. तर, जाणून घेऊया या दोघांमधील फरक 

फक्त वजन कमी करणे हे आरोग्यासाठी पुरेसे नाहीये. कारण या प्रक्रियेत वजनाबरोबरच मसल्स, पाणी, ग्लायकोजन आणि फॅट लॉस होते. तर, फॅट लॉसमध्ये शरीरात साचून राहिलेल्या बॉडी फॅटला कमी केले जाते. त्यामुळं फॅट लॉस करणे हा पर्याय जास्त चांगला मानला जातो. 

वेट लॉस काय आहे? 

वेट लॉसचा साधा सरळ अर्थ आहे तो म्हणजे शरीराचे वजन कमी करणे. वजन कमी करण्यासाठी मसल्स, फॅट आणि वॉटर वेट कमी करणे गरजेचे आहे. अशावेळी क्रॅश डाएट आणि ग्लुटन फ्री डाएटच्या माध्यमातून शरीराचे वजन कमी करु शकतात. पण त्याचबरोबर वजनासोबतच शरीराला आवश्यक असलेले स्नायूही कमी होतात, जे शरीराला बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच, जर तुम्हाला स्लिम आणि टोन्ड बॉडी हवी असेल तर यासाठी तुम्ही वजन कमी करू नका तर फॅट लॉस करा. 

फॅट लॉस म्हणजे काय?

फॅट म्हणजेच चरबी ही शरिरातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. मात्र, जेव्हा ती गरजेपेक्षा जास्त वाढते तेव्हा अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. शरीरातील जमा झालेल्या या चरबीला कमी करण्याच्या प्रक्रियेला फॅट लॉस असं म्हटलं जातं. शरीरातील फॅट बर्न करत असतानाच मसल्स गेन करण्याच्या प्रक्रियाला फॅट लॉस असं म्हणतात. शरीरातील चरबी कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कॅलरी कमी करणे आणि हार्ड वर्कआउट्स. जर तुम्हाला टोन्ड बॉडी मिळवायची असेल तर त्यासाठी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी केली पाहिजे.

फॅट लॉस कसं कराल?

प्रोटीन शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वे पुरवते. प्रोटीन तुमच्या मांसपेशियांना मेंटेन ठेवते व नवीन मांसपेशीयाच्या विकासासाठी खासकरुन वेट लॉससाठी मदत करते. 

व्यायाम

फॅट लॉस करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे व्यायाम. लठ्ठपाणाला वैतागलेल्या लोकांनी कमी कॅलरी असलेले डाएट घ्यावे त्याचबरोबर आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा व्यायाम व वेट ट्रेनिंग घ्यावे.