Sadhguru Breakfast For Weight Loss : आजकाल लोक आपल्या फीटनेस बद्दल अतिशय जागृत झाले आहेत. लठ्ठपणा किंवा वाढलेले वजन कमी करणे हे सगळ्यात कठीण गोष्ट आहे. वजन जेवढ्या झपाट्याने वाढतं ते कमी करण्यासाठी त्यापेक्षा अधिक वेळ लागतो. प्रत्येकाला वाटतं आपण स्लिम आणि फीट दिसावं म्हणून मार्केटमध्ये मिळणारे सप्लिमेंट्स लोक वापरतात. ग्रीन आणि अनेक असे ड्रींक घेऊन ते वजन कमी करण्यासाठी घेतात. काही जण डाएटिंग किंवा जीमला जाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. अगदी योगासनाने देखील वजन कमी करून ते स्थिर ठेवता येतं. (according to sadhguru eat cucumber in breakfast for natural weight loss video)
पण डाएटिंग करताना किंवा वजन कमी करण्यासाठी कुठले पदार्थ खाले पाहिजी किंवा टाळले पाहिजे याबद्दल आपण्यास माहिती नसतं. वजन कमी करण्यासाठी सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी घरगुती आणि रामबाण उपाय सांगितला आहे. ब्रेकफास्टमध्ये त्या पदार्थाचं सेवन केल्यास वजन तर कमी होईल सोबतच हृदय आणि हाडे निरोगी राहतील असंही ते म्हणाले. विशेष म्हणजे तेही नाश्तामध्ये याच पदार्थाचं सेवन करतात असंही त्यांनी सांगितलं आहे.
सद्गुरु यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे की, काकडी ही वजन कमी करण्यासाठी त्याचं सेवन करावं. काकडी ही पाण्यापेक्षाही जास्त फायदेशीर आहे. ते म्हणतात की, पाणी पिण्यापेक्षा पाण्याचे प्रमाण असलेले पदार्थांचं सेवन केल्यास तुम्हाला फायदा होईल. कारण या पदार्थांमुळे तुमचं संपूर्ण शरीर हायड्रेशन वाढविण्यात आणि पीएच पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतो.
काकडीमधून आपल्याला फायबर मिळतं त्यामुळे आपली चयापचन गतिमान होते. ज्या पदार्थ्यांमध्ये कमी कॅलरी असतात त्याचं सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्याशिवाय काकडीमध्ये व्हिटॅमिन केचा चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे काकडीचं सेवन केल्यास आतड्यांचं आरोग्य सुधारतं, हाडांची घनता वाढते, कर्करोगाचा धोका कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारतं असं ते म्हणतात.
सद्गुरूंनी वजन कमी करण्यासाठी काकडी खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. ते म्हणतात की, दिवसातून दोन वेळा काकडीचं सेवन केलं पाहिजे. मेटाबॉलिज्म वाढविण्यासाठी काकडी तुम्हाला मदत करेल. त्याशिवाय दोन मिलमध्ये कायम सहा ते आठ तासांचा गॅप असायला हवा असेही ते म्हणाले.
तुम्ही रोज खात असलेले अन्नपदार्थ हे तुम्हाला ऊर्जा देण्याचं काम करतं. अशावेळी सद्गुरु म्हणतात की, शिजवलेले जेवण हे दीड तासाच्या आत खाणे गरजेचं असतं. त्यानंतर हे अन्न खाल्ल्यास तुमच्या शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. डायनामिझम सारखा त्रासही तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे शिळं अन्न खाऊ नये.