health news: वयानुसार किती असावं नॉर्मल ब्लडप्रेशर?, महिला आणि पुरूषांसाठी असतं वेगवेगळं, जाणून घ्या!

धावपळीमुळे लोकांच्या रक्तदाबावर (blood pressure) परिणाम होऊ लागला आहे.

Updated: Nov 8, 2022, 05:18 PM IST
health news: वयानुसार किती असावं नॉर्मल ब्लडप्रेशर?, महिला आणि पुरूषांसाठी असतं वेगवेगळं, जाणून घ्या! title=

Blood Pressure and Age: आपल्या आयुष्यात ताणताणवांनी नुसतं घर करून सोडलं आहे. आपल्या आयुष्यात हल्ली असे अनेक प्रसंग घडतंही असतात जे तणावपुर्वक (tensions) असतात. तेव्हा आपल्याला आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवणं महत्त्वाचं ठरतं आहे. सध्या आपल्या त्रागाचा आणि आपल्या तापट वागण्याचा आपल्या आयुष्यावरही चांगला-वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्यालाही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आपण आयुष्यात जितके (happiness quotes) आनंदी राहू, तितकेच आपले आयुष्य हे अधिक आनंदी आणि समाधानी असते. तुमच्या रागाचा (anger) आणि तणावाचा (how to overcome anger) तुमच्या आयुष्यावरही घातक परिणाम होत असतो आणि त्याचा थेट संबंध तुमच्या रक्तदाबावर असतो. (What should be the blood pressure according to age there is a different range for women and men)

धावपळीमुळे लोकांच्या रक्तदाबावर (blood pressure) परिणाम होऊ लागला आहे. काही लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो तर काहींना कमी रक्तदाब असतो. हे दोन प्रकार आपल्याला रक्तदाबाचे माहिती आहेतच. परंतु तुम्हाला माहितीये का की आपल्या शरीरात रक्तदाब मोजण्याप्रमाणेच आपल्या वयानुसारही तो किती कमी - जास्त असावा याचा अंदाज लावता येतो. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया. 

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

स्त्री-पुरूषांमध्ये कसा असतो रक्तदाब? :

बालपणात मुलींचा रक्तदाब हा मुलांइतकाच असतो. पौगंडावस्थेनंतर मुलींचा रक्तदाब मुलांच्या तुलनेत थोडा कमी होतो परंतु रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांचा रक्तदाब पुरुषांपेक्षा जास्त होतो. 

जाणून घ्या रेंज : 

नॉर्मल रेन्जचा (what is the normal range) रक्तदाब हा 120/80 इतका असतो परंतु हीच गोष्ट स्त्रियांच्या आणि पुरूषांच्या बाबतीत वेगवेगळी ठरते. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या वयाबरोबरच स्त्रिया आणि पुरूषांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण कसे असते. सामान्य रक्तदाब हा 120/80 एवढा असतो परंतु तज्ञांच्या मते तो वयानुसार बदलू शकतो. वयानुसार सामान्य रक्तदाब 90/60 ते 145/90 दरम्यान असू शकतो. पण ही रेंजही आपल्या शारीरीक स्थितीवर अवलंबून असते. 

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

असं बदलतात आकाडे? : 

तज्ञांच्या मते पुरुषांमध्ये रक्तदाबाची वरची श्रेणी 90/60 ते 145/90 पर्यंत असू शकते. नवजात बालकांचा रक्तदाब 90/60, 6 महिने ते 2 वर्षे वयोगटातील मुलांचा रक्तदाब 100/70, 18 वर्षांपर्यंतचा रक्तदाब 120/80, 40 वर्षांपर्यंतचा रक्तदाब 135/80 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांचा रक्तदाब वाढू शकतो तर त्याहूनही ती 145/90 पर्यंत वर असू शकेल. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)