व्हाईट ब्रेड खात असाल तर सावधान! तुम्ही या गंभीर आजारांना निमंत्रण देताय

तुम्हाला हे माहित आहे का? ब्रेड जेवढे खायला स्वादिष्ट असतात तेवढेच ते अनेक वेळा आरोग्यासाठी हानिकारकही ठरतात.

Updated: Dec 29, 2021, 04:54 PM IST
व्हाईट ब्रेड खात असाल तर सावधान! तुम्ही या गंभीर आजारांना निमंत्रण देताय title=

मुंबई : सकाळी उठल्यावर आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यत महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम आणि नाष्टा. सकाळी व्यायामाबरोबरच भरपेट नाष्टा देखील आपल्याला महत्वाचा असतो. परंतु मग अशावेळी नक्की काय नाष्टा करावा असा प्रश्न आपल्याला पडतो. काही घरांमध्ये नाष्टा म्हणून लोकं पोहे, उपमा हे पदार्थ खातात. तर बऱ्याच घरांमध्ये लोकं नाष्टामध्ये ब्रेड खाणं पसंत करतात. ब्रेड हा सगळ्या सोपा आणि बाजारात लगेच उपलब्ध होणारा पदार्थ आहे.

शाळकरी मुलं असोत की ऑफिसला जाणारी तरुणाई, सर्वांनाच ब्रेड खायला आवडते, कारण ती आहारात हलकी असते.

तुम्हाला हे माहित आहे का? ब्रेड जेवढे खायला स्वादिष्ट असतात तेवढेच ते अनेक वेळा आरोग्यासाठी हानिकारकही ठरतात. ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेट असते, जे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. जर तुम्ही नियमितपणे व्हाईट ब्रेडचे आहारात सेवन करत असाल तर त्याचे सेवन करणं तुम्हाला महागात पडणार आहे. आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकते. खरं तर, व्हाईट ब्रेड पोषणाच्या दृष्टीने शून्य मानली जाते.

व्हाईट ब्रेड हे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही रोज व्हाईट ब्रेडचे सेवन करत असाल तर आजपासून ते खाणं बंद करा.

व्हाईट ब्रेड कसा बनवला जातो?

व्हाईट ब्रेड बनवण्यासाठी गव्हाचे पीठ किंवा मैदा वापरला जातो. त्यांना विविध रसायनांचा वापर करून ब्लीच केले जाते, ज्यामुळे ते व्हाईट दिसते. तसेच व्हाईट ब्रेड बनवण्यासाठी पिठात पेरोक्साइड, क्लोरीन डायऑक्साइड आणि पोटॅशियम ब्रोमेट यांसारखी रसायने वापरली जातात. यामुळेच व्हाईट ब्रेड शरीराला हानी पोहोचवते.

व्हाईट ब्रेडचे सेवन का करू नये?

जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या ब्रेडमध्ये समान प्रमाणात कॅलरीज आढळतात. पांढऱ्या ब्रेडच्या स्लाईसमध्ये सुमारे 77 कॅलरीज असतात, तर ग्लायसेमिक इंडेक्स जास्त प्रमाणात आढळतो. तर त्यातील पोषक तत्वे नगण्य आहेत.

रक्तातील साखरेची पातळी वाढवते

व्हाईट ब्रेडमध्ये ग्लायमॅक्सचे प्रमाण जास्त असते, याचा सरळ अर्थ असा की, त्यामुळे ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढते, तसेच रक्तातील साखरेची पातळी देखील झपाट्याने वाढते. त्यामुळे शरीरात अनेक आजार होतात.

वजन वाढते

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि फिटनेसकडे विशेष लक्ष द्यावे, तर तुम्ही चुकूनही व्हाईट ब्रेडचे सेवन करू नये. खरं तर, व्हाईट ब्रेड देखील वेगाने वजन वाढवण्याचे काम करते. या ब्रेडमध्ये पोषक आणि फायबरची कमतरता असते. त्यामुळे व्हायरल ब्रेडचे सेवन करु नये.