डाएटिंग करुनही हार्ट अटॅक का येतो? सांगते न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर

Rujuta Diwekar Health Tips : डाएटिंग करुनही, वजन कमी असूनही एखाद्या व्यक्तीला आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तेव्हा असं कसं होतं? हा अनेकांचा प्रश्न पडतो अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगते त्यामागचं खरं कारण? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 16, 2024, 09:55 AM IST
डाएटिंग करुनही हार्ट अटॅक का येतो? सांगते न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर  title=

What is Perfect Diet : वजन कमी करणे, स्लिम राहणं हे अनेकांचं नवीन वर्षाचं संकल्प असतं. पण फक्त वजन कमी करणे किंवा फिट राहणे हेच निरोगी आणि सुदृढ आरोग्याचं लक्षण आहे. हा विचारच मुळात चुकीचा आहे. कारण सुदृढ आणि निरोगी आयुष्याची संकल्पना समजून घेणे अत्यंत गरजेची आहे. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर या कायमच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुदृढ आरोग्याची माहिती शेअर करतात. यावेळी ऋडुताने TOFI आणि FOTI याबद्दल माहिती दिली आहे.  डाएट करुन, स्लिम असूनही कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक आणि फॅटी लिव्हरच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी लोकांचं नेमकं काय चुकतं हे ऋजुताने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. ते जाणून घेऊया. 

ऋजुता दिवेकर पोस्ट 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rujuta Diwekar (@rujuta.diwekar)

TOFI म्हणजे काय?

TOFI म्हणजे Thin Outside Fat Inside. जसे की, लोकं वजन कमी करतात, स्लिम होतात. त्यामुळे बाहेर वजन दिसत नाही. तुम्ही अतिशय फिट वाटता. पण हे फिट वाटनं शरीरातून नसतं. शरीरात कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण पाहतो की, एखादी व्यक्ती जिमला जाऊनही, फिट असूनही त्याला हार्ट अटॅक येतो? त्यामुळे तुमचं फिट राहणं फक्त बाहेरूनच नाही तर आतूनही असणे आवश्यक आहे. 

FOTI म्हणजे काय?

FOTI म्हणजे Fat Outside Thin Inside. अनेकजण शरीराने चब्बी असतात पण आतून ते अतिशय तंदुरुस्त असतात. बाहेर कितीही फॅट दिसले तरीही शरीरात आतमधील सगळे रिपोर्ट चांगले असते. याचा असतात चरबीचा कोणताही ताण त्यांच्या हृदयावर पडत नाही. त्यामुळे तुम्ही नेमक्या कोणत्या प्रकारात मोडता याचे आकलन करणे ऋजुता दिवेकर सांगते. 

फोकस कशावर करायचं?

न्यूट्रशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगते की, यामुळे तुम्ही फोकस कशावर करता हे महत्त्वाचा आहे. तुमचा तुमच्या आहाराप्रती असलेला फोकस अतिशय महत्त्वाचा आहे. तुमचा आहार आणि तुमची दिनचर्या तुम्हाला सुदृढ राहण्यास मदत करणार आहे. बाहेरील सौंदर्य तुम्हाला सुंदर दिसण्यास मदत करतं. मात्र आतील सौंदर्य आणि फिटनेस तुम्हाला अनेक दिवस सुंदर जीवन जगण्यास मदत करतं. 

आतून फिट असल्याचा फायदा? 

तुमचं शरीर आतून फिट आणि सुदृढ असेल तर एनर्जी लेव्हल चांगली राहते. दिवसभर तुम्ही फ्रेश दिसता. एवढंच नव्हे तर त्वचा आणि केस यांचा पोतही चांगला राहतो. मूड स्विंग्स होण्याच्या समस्या जाणवत नाही, तुम्ही प्रोडक्टिविटी देखील चांगली राहते. जसे की, गर्भधारणेत समस्या जाणवत नाही. दीर्घायुष्य राहण्यासाठी या गोष्टी नक्कीच मदत करतात. एवढंच नव्हे तर स्ट्रेसही कमी होतो आणि आरोग्याच्या समस्या दूर होतात. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)