मुंबई : लग्न हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागतो. अधिकतर महिला नव्या आयुष्यात अड्जस्ट होण्याचा प्रयत्न करत असतात. तर काहींना हे बदल पचनी पडत नाही मग त्या पश्चात्ताप करु लागतात. खरंतर लग्नानंतर मुलीचे फक्त घर नाही तर संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. अनेकदा तर त्यांना उगीच लग्न केले असे वाटू लागते. जाणून घेऊया मुलींना नक्की कोणत्या गोष्टींमुळे लग्नाच्या निर्णयाचा पश्चात्ताप होतो...
लग्नानंतर मुलींना घर, ऑफिस, संसार अशी तारेवरची कसरत करावी लागते. या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून त्यांना स्वतःसाठी खूप कमी वेळ मिळतो. यामुळे त्या त्रासल्या जातात आणि त्यांना उगाच लग्न केले असे वाटू लागते.
प्रत्येकाला आपल्या आयुष्यात पर्सनल स्पेसची गरज असते. पण लग्नानंतर मुलींच्या आयुष्यातील हा शब्दच गायब होतो. पर्सनल स्पेस न मिळाल्याने मुलींची चिडचिड होते आणि लग्नापूर्वीचे आयुष्य त्यांना प्रिय वाटू लागते.
विवाहित मुलींना अनेक गोष्टींच्या बाबतीत तडजोड करावी लागते. त्यांना प्रत्येक स्थितीत जुळवून घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. या सगळ्यामुळे अनेकदा त्या इरिटेट होतात. स्वतःला सतत बदलण्याच्या त्यांना पश्चात्ताप होऊ लागतो.
खरंतर कधीच आपल्या पार्टनरची एक्सची तुलना करु नये. यामुळे अनेकदा वैवाहिक नात्यात अनेक अडचणी येतात. पार्टनरची सतत एक्स गर्लफ्रेंडसोबत तुलना केल्याने त्यांना लग्नाचा निर्णय चुकीचा वाटू लागतो.
लग्नानंतर बाळ होण्याचा दबाव कळत-नकळत मुलींवर येतो. बाळासाठी तुम्ही तयार असा किंवा नाही, पण याबद्दलच्या अनेक प्रश्नांना मुलींना सामोरे जावे लागते. बाळासाठी सारखा मागे तगादा लावल्यास त्यांना लग्नाचा निर्णय योग्य नसल्यासारखे वाटू लागते.