Weight Gain After Marriage : लग्नानंतर महिला का होतात लठ्ठ ? जाणून घ्या खरं कारण...

Women Weight Gain After Marriage  : ''अगं लग्न मानवलं तुला'' असं सहज आपल्याला ऐकायला मिळतं. मात्र यामागचे नेमकं कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत

Updated: Jan 31, 2023, 05:13 PM IST
Weight Gain After Marriage : लग्नानंतर महिला का होतात लठ्ठ ? जाणून घ्या खरं कारण...

Woman Weight Gain After Marriage : लग्न, प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. लग्न म्हणजे , आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो. सध्या लगीनसराई सुरु आहे. सगळीकडे लग्नाचे मुहूर्त निघून लगीनघाईला सुरवात झालीये. लग्न म्हटलं की , विशेषतः मुली फार आधीपासूनच तयारीला लागतात. वजन, स्किन, कपडे , फॅशन या सर्वांची तयारी फार आधीच केलेली असते. प्रत्येकीला आपल्या लागत सर्वांपेक्षा हटके सुंदर आणि स्लिम दिसायचं असतं. यासाठी जिमला जाणं, योगा करणं, डाएट करणं हे सर्वकाही आलं.   

तुम्हाला कधी हे जाणवलंय का, लग्नानंतर स्त्रियांचं वजन वाढू लागंत...पहिल्याच महिन्यात मुलींचं वजन वाढतं. तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का ? यामागे नेमकं काय करणं असू शकतो. 

लग्न (Marriage) हे प्रत्येक तरुणांच्या आयुष्यातील सुंदर क्षण असतात. लग्न, भावी नवरा (husband), सासर, सासरची मंडळी आणि संसार याबद्दल तरुणींनी अनेक स्वप्न रंगवले असतात. लग्नानंतर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. आई-वडिलांच्या (parents) सावलीखाली लहानचं मोठं झाल्यानंतर एका रात्रीत आपलं आयुष्यात अनेक उलथापालथ होतात. अगदी आपली मानसिक स्वास्थ (mental health) आणि शारीरिक स्वास्थावर (Physical health) या बदलाचा परिणाम होतात. 

एका अभ्यासानुसार लग्नाच्या 5 वर्षांनंतर 82 टक्के कपल्सचं वजन 5 ते 10 किलो वाढतं. यामध्ये जास्त जास्त संख्या ही तरुणींची असते. यामागे अनेक कारणं असतात. 

 1- सासरच्या मंडळींनुसार खाणपिणे

लग्नापूर्वी तरुणी आपल्या मर्जीनुसार खातेपिते. हेल्दी (healthy) आणि फिट (fit) राहण्यासाठी ती आपल्या डाएटवर (Diet) लक्ष ठेवून असते. मात्र लग्न झाल्यावर सासरच्या मंडळींनुसार तिला खावं लागतं. अगदी जेवण्याचा वेळाही बदलतात. सासरच्या मंडळी नाराज होऊ नये म्हणून ती आपल्या हेल्दी डाएट (healthy diet) विसरून जाते. कधी कधी तर सगळ्यांचं जेवण झाल्यावर अन्न वाया जाऊन नये म्हणून जास्त खाल्लं जातं. 

2- फिटनेसकडे (fitness) दुर्लक्ष 

लग्नानंतर मुलं आयुष्यासोबत तिचं राहणीमान तिची दिनचर्याच बदलून जाते. सासर आणि नवऱ्याच्या लाइफस्टाइलप्रमाणे बदलावं लागतं. अशात तिचं फिटनेस रुटीनकडे दुर्लक्ष होतं. 

3- हार्मोनलमध्ये अनेक बदल (hormonal changes)

लग्नानंतर सेक्सुअल लाइफमुळे (Sexual life) डेली रुटीन आणि तुमचं इंटरनल बॉडीमध्ये अनेक बदल होतात. त्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्यांच्या (birth control pills) वापरामुळे तुमचं वजन वाढतं. 

4 - नातेवाईकांकडे पाहुणचार

 लग्नानंतर नवीन जोडप्याला नातेवाईकांकडे जेवण्यासाठी बोलवलं जातं. तिथे त्यांचासाठी केलेल वेगवेगळे पदार्थ आग्रहासह खावे लागतात. यामुळेही कल्पसचं वजन वाढतं. 

5 - स्ट्रेस लेवल वाढते (Stress levels increase)

लग्नानंतर मुलींना खूप तणावाचा (stress) सामना करावा लागतो. तणावामुळे अनेक तरुणींना जास्त खाण्याची सवय असते. ज्यातून तरुणींचं वजन वाढतं.  

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)