World Down Syndrome Day 2024 News In Marathi : आजकालची व्यस्त जीवनशैली आणि अवेळी खाण्यापिण्याच्या सवयीमुळे विविध आजारांचा सामना कारावा लागतो. अनेक आपल्याला आजारांबाबतीच नवीन नावे ऐकायला मिळतात. कोरोनाकाळातच आपण नवीन व्हेरिंएट आला आहे, असं नक्कीच ऐकलं असणार. असा एक आजार आहे, जो लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. डाऊन सिंड्रोम हा आजार लहान मुलांमध्ये होत असू या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक स्तरावर दरवर्षी 21 मार्चला साजरा केला जातो. डाऊन सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या काही लोकांना आयुष्यभर वैद्यकिय सुविधांची गरज असते. परंतु अपवादात्मक काही लोक निरोगी आयुष्य जगतात.
डाऊन सिंड्रोम हा एक अनुवांशिक विकार असून ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या पेशींमध्ये अतिरिक्त गुणसूत्र जोडले जातात. ज्याला क्रोमोसोम 21 असेही म्हणतात. प्रत्येक गुणसूत्रावर शेकडो ते हजारो जीन्स असतात. जीन्स डीऑक्सीरिबोज न्यूक्लिक ॲसिड (डीएनए) पासून बनतात. जीन्समध्ये एखाद्याच्या शरीराशी संबंधित माहिती असते, जी प्रत्येक व्यक्तीची वाढ, विकास आणि विशिष्ट वैशिष्ट्ये ठरवते. साधारणपणे प्रत्येक स्नायूमध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. परंतु डाऊन सिंड्रोम सारख्या जन्मजात परिस्थितीसह जन्मलेल्या मुलांमध्ये अतिरिक्त गुणसूत्र 21 असते, ज्यामुळे मुलाच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होतो. यामध्ये डाउन सिंड्रोम असलेल्या लोकांमध्ये सामान्यतः अद्वितीय शारीरिक वैशिष्ट्ये असतात आणि त्यांना विशेष वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. डाऊन सिंड्रोम असलेल्या काही लोकांना आयुष्यभर वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. पण अपवादाने काही लोक निरोगी आयुष्य जगतात.
तसेच लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक डाऊन सिंड्रोम दिवस हा 21 मार्च ला साजरी केला जातो. 2012 पासून संयुक्त राष्ट्र संघाकडून अधिकृतपणे साजरा केला जातो. तसेच जगातील प्रत्येक 1000 मुलांपैकी 1 हा डाऊन सिंड्रोमने जन्माला येतो. डाऊन सिंड्रोम हा मूलभूत मानसिक आणि शारीरिक विकारांसह जन्मामुळे होतो. त्यामुळे बालकाचा शारीरिक व मानसिक विकास लांबून समस्या निर्माण होतात. मात्र, त्याच्या चेहऱ्याचा आणि नाकाचा आकारही थोडा वेगळा होतो. डाऊन सिंड्रोम 21 व्या गुणसूत्राच्या अतिरिक्त प्रतीमुळे होतो. म्हणूनच त्याला ट्रायसोमी-2 असेही म्हणतात. हा अनुवांशिक विकार मानला जातो.
हा आजार जन्मत: असलेल्या पेशीतील गुणसूत्रांच्या दोषामुळे होतो. तसेच आपल्या शरीरातील पेशीत 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. त्या गुणसूत्रात 23 वे गुणसूत्रे हे सेक्स क्रोमोझोम (X and Y) असते. डाउन सिड्रोम असलेल्या बालकांत 21 व्या गुणसूत्राच्या जोडीत एक अधिक म्हणजे दोनच्या जागी तीन गुणसूत्र असतात.
डोळे उंचावलेले किंवा तिरके दिसणे
पसरलेली जीभ
सपाट चेहरा
कान, तोंड किंवा डोके लहान होणे
मानेचा आणि बोटांचा लहान आकार
डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांना बसणे, उभे राहणे आणि चालणे यासारख्या गोष्टी शिकण्यास इतर मुलांपेक्षा जास्त वेळ लागतो. डाउन सिंड्रोम असलेल्या मुलांमध्ये खालील लक्षणे दिसतात. मुलांना नवीन गोष्टी शिकायला जास्त वेळ लागतो. ध्येय ठेवण्यास असमर्थता, बोलण्यात अडचण, निर्णय घेण्यात संकोच, हट्टीपणा, झोप न लागणे, अशी लक्षणे डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांमध्ये आढळतात.