World Health Day - कोणत्या वयात कोणत्या तपासण्या करणे आवश्यक?

आज ७ एप्रिल म्हणजे विश्व स्वास्थ्य दिवस.

Updated: Apr 7, 2018, 04:52 PM IST
World Health Day - कोणत्या वयात कोणत्या तपासण्या करणे आवश्यक? title=

मुंबई : आज ७ एप्रिल म्हणजे विश्व स्वास्थ्य दिवस. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वास्थ्याच्या अनेक समस्या जडत आहेत. त्याचबरोबर वाढत्या वयासोबत शरीरात अनेक बदल होत असतात आणि योग्य ती काळजी न घेतल्यास आरोग्याच्या नाना विध समस्या जडू लागतात. तसंच यासाठी आपल्या काही चुकीच्या सवयीही कारणीभूत ठरतात. जसं की जेवण्याचा अयोग्य वेळा, व्यायाम न करणे, अनहेल्दी पदार्थांचे सेवन, व्यसने. म्हणून हेल्दी राहण्यासाठी योग्य त्या वयात आवश्यक त्या तपासण्या करणे गरजेचे आहे. पाहुया कोणत्या वयात कोणत्या टेस्ट कराव्यात...

वय वर्ष २०-

प्रत्येक वर्षी रक्तदाबाची तपासणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उंची आणि वजन नियमित तपासून पहा. दात आणि डोळ्यांचे आरोग्य तपासा. प्रत्येक दोन वर्षांनी एचआयव्हीचे स्क्रीनिंगही करणे आवश्यक आहे. पाच वर्षांनी कोलेस्ट्रॉल तपासणे, काळाची गरज झाली आहे.

वय वर्ष ३०-

वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त मधुमेह, थायरॉयईड, अॅनेमिया आणि लिव्हर यांचे आरोग्य तपासावे. रक्ततपासणी करावी. वर्षातून एकदा हृदयासंबंधित आजारांची तपासणी करायला हवी.

वय वर्ष ४०-

वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त दर पाच वर्षांनी एकदा कार्डिओवरक्युलर इवेल्यूएशन करणे गरजेचे आहे. तर वर्षातून एकदा प्रोस्टेट कॅन्सरची तपासणी करणे आवश्यक आहे.

वय वर्ष ५०-

वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त प्रत्येक वर्षी एकदा टाईप टू मधुमेह तपासणी करावी. प्रत्येक वर्षी डोळे, कान याव्यतिरिक्त मानसिक आरोग्य, लिपिड डिसऑर्डरची तपासणी करावी.

वय वर्ष ६०-

वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त ऑस्टियोपोरोसिससाठी प्रत्येक वर्षी स्क्रीनिंग. याशिवाय डिमेशिया आणि अलजायमर याची प्रत्येक वर्षी तपासणी करावी.