चेहऱ्यावरील सुरकुत्यांनी हैराण? आहारात करा या 4 पदार्थांचा समावेश आणि पाहा जादू

बऱ्याच महिला वाढत्या वयाची चेहऱ्यावर दिसणारी चिन्हंही लपवू इच्छितात.

Updated: Jun 30, 2022, 10:13 AM IST
चेहऱ्यावरील सुरकुत्यांनी हैराण? आहारात करा या 4 पदार्थांचा समावेश आणि पाहा जादू  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Anti Ageing Foods For Younger Skin: वय वाढत असताना शरीरात काही बदल होणं स्वाभाविक आहे. हे बदल अनेकजण सकारात्मकतेनं स्वीकारतात. पण, काहींना मात्र म्हातारपणाचीच भीती वाटते. चेहऱ्यामध्ये बदल होणार, चेहऱ्यावर सुरकुत्या येणार या भीतीनं तर बहुतांश महिलाबर्ग चिंतेत असतो. (Wrinkle Removing Tips anti aging food items)

चेहऱ्याचं सौंदर्य जपण्याकडे सध्याच्या पिढीचं, त्यातही मध्यमवयीन वर्याचं प्राधान्य असल्याचं दिसून येतं. बऱ्याच महिला वाढत्या वयाची चेहऱ्यावर दिसणारी चिन्हंही लपवू इच्छितात. असं करण्यासाठी महागड्या क्रिम आणि लोशन वापरण्याची गरज नाही. कारण, आहार आणि काही खास सवयींनीही तुम्ही सुरकुत्या मिटवू अथवा कमी करु शकता. 

- अॅवाकाडो 
अॅवाकाडो ही एक अशी फळभाजी आहे ज्यामध्ये विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी, विटामिन ई, विटामिन के आणि पोटॅशियमसारखी पोषक तत्त्वं असतात. यामुळं निर्जीव त्वचेला तजेला येतो. 

- डाळी 
डाळ आरोग्यास कधीही फायद्याची ठरते. पण, डाळीच्या सेवनाचा फायदा त्वचेलाही होतो हे तुम्हाला माहितीये? डाळीमध्ये प्रोटीन, मिनरल्स, फाइटोन्यूट्रिएंट्स, विटामिन, फायबर आणि महत्त्वाची पोषण तत्त्वं असतात. त्वचेतील पेशींना या साऱ्याचा फायदा होतो. 

- पालक 
पालेभाज्या म्हणजे चांगल्या आरोग्यासाठी वरदान. पालेभाज्यांमध्ये  विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, विटामिन के, मॅग्नेशियम आणि लोह असे घटक असतात. पालेभाज्या आणि विशेष म्हणजे पालकाच्या सेवनामुळं त्वचेत अपेक्षित घटक राखले जातात. सुरकुत्याही कमी होतात. 

- पपई 
या फळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असणारे अनेक घटक आढळतात. पपईच्या सेवनानं चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. सकाळच्या न्याहरीच्या वेळी या फळाचं सेवन फायद्याचं. 

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)