योगा पडला भारी, महिलेला तातडीने नेलं रूग्णालयात

योगा करताना काळजी घेतली पाहिजे कारण कधीकधी अगदी लहानशी चूक देखील महागात पडू शकते.

Updated: Oct 5, 2021, 09:00 AM IST
योगा पडला भारी, महिलेला तातडीने नेलं रूग्णालयात title=

बीजिंग : गेल्या काही वर्षांमध्ये लोकांना योगाचं महत्त्व समजलं असून त्याची क्रेझ खूप वाढलीये. विशेषत: तरुणांनीही स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग करायला सुरुवात केलीये. योगा करताना काळजी घेतली पाहिजे कारण कधीकधी अगदी लहानशी चूक देखील महागात पडू शकते. चीनच्या एका महिलेसोबतही असंच घडलं. तिचं हाड मोडलं तेव्हा ती महिला तिच्या शिक्षकाच्या उपस्थितीत योगासन करत होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.

'इंडिपेंडंट'च्या अहवालानुसार, पीडित महिलेचं नाव वांग असून ही घटना चीनच्या अनहाई प्रांतातील आहे. वांग एका खासगी योग शिक्षकाकडे योग शिकण्यासाठी जात होती. तिच्या योगा शिक्षकाने त्याला ड्रॅगन पोज करायला सांगितलं. तिने प्रयत्न केला तेव्हा तिचं हाड मोडलं. 

वांगने सांगितलं की, शिक्षक तिच्या थाई खूप जोरात पुश करत होता. या काळात तिला खूप वेदना जाणवत होत्या आणि तिला तिचा पाय हलवताही येत नव्हता. त्यावेळी तिला काय झालं ते कळलं नव्हते. फक्त तिचा पाय हलत नव्हते, जेव्हा वेदना वाढली तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आलं. 

डॉक्टरांनी सांगितलं की, हाडात फ्रॅक्चर आहे. यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितलं. सुरुवातीला, वांग घाबरली होती, परंतु जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशननंतरच तिचा पाय बरा होऊ शकेल, तेव्हा तिने होकार दिला.

Instructorने उचलला उपचारांचा खर्च

महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती महिला सुमारे 16 दिवस रुग्णालयात राहिली. या काळात तिला चालणंही शक्य नव्हतं. वांगच्या योग शिक्षकाने हॉस्पिटलचा सर्व खर्च उचलला. त्यांनी उपचारांवर सुमारे चार लाख रुपये खर्च झाला.