भूक कमी लागत असल्यास ही ५ आसने करा!

आपल्याला भूक कमी अधिक लागण्याचा संबंध पचनशक्तीशी असतो. 

Updated: May 18, 2018, 08:57 AM IST
भूक कमी लागत असल्यास ही ५ आसने करा! title=

मुंबई : आपल्याला भूक कमी अधिक लागण्याचा संबंध पचनशक्तीशी असतो. योग ही अशी साधना आहे ज्यामुळे शारीरिक-मानसिक आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होते. त्यामुळे भूक कमी लागण्याच्या समस्येवरही परिणाम करते. म्हणून जर तुम्हाला कमी भूक लागत असेल तर ही योगासने नक्की करा.

पवनमुक्तासन

हे आसन भूक वाढवण्यासाठी आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. या आसनात ४०-५० सेकंद रहा आणि ४-५ वेळा याची आवर्तने करा.

वज्रासन

रक्तप्रवाह, भूक आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी हे उपयुक्त आसन आहे. या आसनात कमीत कमी मिनिटभर रहा आणि रोज करताना हळूहळू वेळ वाढवत न्या.

बद्धकोणासन

भूक न लागण्याची समस्या असेल तर हे आसन करणे फायद्याचे ठरेल. या आसनामुळे बद्धकोष्ठता, अपचन यावर आराम मिळतो. पण हे आसन आपल्या शारीरिक क्षमतेनुसारच करा. नियमित केल्याने त्यावर पकड येईल.

शशांकासन

या आसनामुळे पोट आणि पोट्याच्या स्नायूंना उत्तम मसाज मिळतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.

चिन्मय मुद्रा

या मुद्रेमुळे शरीरात रक्तसंचार उत्तमरीत्या होतो. पचनतंत्र सुधारुन भूक वाढवण्यास ही मुद्रा उपयुक्त ठरते. चिन्मय मुद्रा करताना २-३ मिनिटे श्वास घ्या आणि आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या.