Lifestyle Health : भारतीय स्वयंपाक करताना गरम मसाल्याचा म्हणजे खड्डे मसाले मोठ्या प्रमाणात वापर करतात. लवंग, वेलची, दालचिनी, चक्रीफूल, काळीमिरी, ज्येष्ठमध, जायफळ, धणे यामुळे पदार्थांची चव वाढवतात. येवढंच नाही तर या गरम मसाल्याने आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो. आयुर्वेदानुसार या गरम मसाल्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, एक चमचा तूप आणि अर्धा चमचा काळीमिरी सेवन केल्यास 9 आजारांवर फायदा होणार आहे. (You will be surprised to know 9 health benefits of eating ghee and black pepper Lifestyle Health in marathi)
काळीमिरीमध्ये पिपेरीन हा घटकामुळे स्तनांचा कर्करोगबद्दल फायदा होतो. त्याशिवाय त्यात जीवनसत्त्व सी, ए, फ्लेवोनोइड्स, कॅरोटिन आणि इतरही अँण्टीऑक्सिडंट असतात. तर तूपामध्ये पौष्टिक फॅट, अँण्टीऑक्सिडंट, जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे तूप आणि काळीमिरी सेवन तुम्हाला फायदा होतो.
1 काळीमिरी आणि तूप एकत्र खाल्ल्याने सर्दी-खोकला ठिक करण्यासाठी फायदेशीर ठरतं. एक चमचा गायीच्या तुपात अर्धा चमचा काळीमिरी पावडर मिसळून खाल्ल्याने कोरड्या खोकल्यावर आराम मिळतो.
2 रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. यासाठी देशी तुपाच्या काही थेंबात थोडीशी काळी मिरी पावडर मिसळून रोज सेवन करा.
3 पायाच्या तळव्याला तूप लावल्याने दृष्टीही सुधारते. तुपात जीवनसत्त्व 'ए' भरपूर प्रमाणात असल्याने आरोग्य सुधारायला मदत होते.
4 अर्टिकेरिया हा शितपित्ताशी संबंधित त्वचाविकार असल्यामुळे त्वचेवर लाल रंगाचे पुरळ उठून सतत खाज सुटते. यापासून आराम मिळवण्यासाठी काळी मिरी पावडर एक चमचा देशी तुपात मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास फायदा मिळतो.
5 हिवाळ्यात सांधेदुखीची समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काळीमिरी तूप मिश्रणाचं सेवन करा. हे मिश्रण साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरतं.
6 काळीमिरी आणि तूप हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. त्यामुळे पचनक्रियेतील अडथळे दूर होण्यास मदत मिळते.
7 तूप आणि काळी मिरी यांच्या मिश्रणामुळे ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाल्ल्यास शरीरातील रक्ताभिसरण सुधारुन हृदय निरोगी राहण्यास मदत मिळेल.
8 काळीमिरी आणि गाईच्या तूपाचं सेवन केल्यास कफ वितळण्यास फायदा होतो.
9 तुम्हाला भूक किंवा तहान लागत नसेल तर तूप आणि काळीमिरी यांचं सेवन केल्यास भूक वाढण्यास मदत होते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)