Jammu Kashmir: चकमकीत भारतीय जवानांकडून 1 दहशतवादी ठार; शोध मोहिम सुरू

 जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या हाती मोठ यश

Updated: Jul 25, 2021, 08:34 AM IST
Jammu Kashmir: चकमकीत भारतीय जवानांकडून 1 दहशतवादी ठार; शोध मोहिम सुरू

कुलगाम : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये रविवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. सध्या या ठिकाणी शोध मोहिम सुरू आहे. या भागात आणखी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. 

खबरदारीचा उपाय म्हणून प्रभावित भागाला जवानांनी चारही बाजून घेरलं आहे. दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी भारतीय जवानांनी कोणत्याही प्रकारचा मार्ग ठेवला नाही. महत्त्वाचं म्हणजे ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

सांगायचं झालं तर सुरक्षा जवानांनी जुलै महिन्याच्या सुरूवातीच्या 24 दिवसांत तब्बल 26  दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. यामध्ये अनेक टॉप कमांडरचा देखील जवानांनी खात्मा केला. सुरक्षा जवानांना हाती लागलेलं मोठ यश आहे.