PPF खात्यांमध्ये फक्त 1000 दरमहा गुंतवा; तब्बल 26 लाखापेक्षा जास्त रक्कम मिळवा

PPF मध्ये 1000 रुपये जरी महिन्याला गुंतवले तरी लाखो रुपयांची रक्कम जमा होऊ शकते. 1000 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही 26 लाख एवढी रक्कम जमा करू शकता.

Updated: Apr 12, 2021, 02:49 PM IST
 PPF खात्यांमध्ये फक्त 1000 दरमहा गुंतवा; तब्बल 26 लाखापेक्षा जास्त रक्कम मिळवा title=

 नवी दिल्ली : PPF Investment: Public Provident Fund (PPF) वर आजही लोकांचा विश्वास आहे. ही अशी गुंतवणूक आहे. ज्यावर तुम्हाला व्याज तर मिळतेच सोबतच कराचीही (TAX)बचत होते.  PPF मध्ये 1000 रुपये जरी महिन्याला गुंतवले तरी लाखो रुपयांची रक्कम जमा होऊ शकते. 1000 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही 26 लाख एवढी रक्कम जमा करू शकता.

  
  PPF खाते 15 वर्षात मॅच्युअर होते. म्हणजेच 15 वर्षांनंतर खातेधारक आपले पूर्ण पैसे काढू शकतात. परंतू पैसे काढण्याएवजी खाते चालू ठेवायचे असल्यास, 5 - 5 वर्षासाठी ते पुढे वाढवू शकतात. यात तुम्ही दरमहा गुंतवणूक करू शकता किंवा न गुंतवणूक करता खाते चालू ठेऊ शकता. PPF खात्यावर साधारण 7.1 टक्के व्याज मिळत असते.
  
  सर्वात आधी PPF मध्ये छोट्या रकमेपासून गुंतवणूक करण्यास सुरूवात करा. शक्य असल्यास वयाच्या 20 व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू करा. 
  
  15 वर्षांनंतर 1.80 लाख रुपये तुम्ही जमा करू शकाल. 7.1 टक्के व्याजानुसार 1.45 लाख रुपये तुम्हाला अधिक मिळतील. ही रक्कम 3.25 लाख रुपयांपर्यंत जाईल.
  
  पुढे 2.5 वर्ष गुंतवणूक सुरू ठेवल्यास व्याज धरून ही रक्कम 5.32 लाख रुपये होईल. 
  
  पुढे 5 वर्ष गुंतवणूक करीत राहिल्यास,  हीच रक्कम 8.24 लाख रुपयांच्या घरात जाऊ शकते. 
  
  तिसऱ्यांदा ही गुंतवणूक 5 वर्षासाठी वाढवल्यास, एकूण गुंतवणूक 30 वर्षांची होऊ शकते. 12.36 लाख रुपये व्याजासह रक्कम जमा होऊ शकते.
 
 चौथ्यांदा आणि पाचव्यांदा 5-5 वर्षांसाठी गुंतवणूक सुरू ठेवल्यास,  एकूण गुंतवणूक 40 वर्षांची होईल. यावेळी तुमची जमा रक्कम व्याजासह 26.32 लाख रुपये होईल.
 
 त्यामुळे वयाच्या 20 वर्षापासून सुरू केलेली  छोटी गुंतवणूक तुम्ही निवृत्त होईपर्यंत 26.32 लाखांवर जाईल. त्यामुळे गुंतवणूक करत रहा.  आर्थिक वृद्धीसाठी नक्की फायदा होईल.