Video : किंग कोब्रा हा भारतातील पुर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे. किंग कोब्रा हा असा साप आहे की, तो चावला तर कोणाला पाणी मागण्याची संधीही देत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कर्नाटकातील अगुंबे गावातील आहे. एका घरामध्ये 12 फूट मोठा किंग कोब्रा सापडला आहे. हा कोब्रा घराच्या परिसरातील झाडामध्ये लपून बसला होता. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
मात्र, घराच्या परिसरात किंग कोब्रा दिसताच घरमालकाने वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर किंग कोब्राची सुटका करण्यात आली. अगुम्बे रेनफॉरेस्ट रिसर्च स्टेशनचे क्षेत्र संचालक अजय गिरी यांनी किंग कोब्राला वाचवतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
12 फूट लांब किंग कोब्रा
अजय गिरी यांनी सांगितले की, 12 फूट लांबीचा साप रस्ता ओलांडत असताना काही नागरिकांना दिसला. एका घराच्या परिसरातील झाडांमध्ये तो लपून बसला होता. घरमालकाने आपल्या घरात एक विषारी साप असल्याची माहिती दिली. वनविभागाने लगेच घटनास्थळी जावून किंग कोब्राची सुटका केली आहे.
किंग कोब्राचा व्हिडीओ
किंग कोब्राचा व्हिडिओ पाहूनच लोक थरथर कापतात, मग कल्पना करा की हा साप तुमच्या समोर आला तर तुमची काय अवस्था होईल. असाच एक किंग कोब्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कर्नाटकमधील असून सध्या किंग कोब्राची सुटका केली आहे. सुटका करतानाचा व्हिडीओ देखील गिरी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
किंग कोब्रा अतिशय धोकादायक
किंग कोब्रा भारतातील पश्चिम घाट, पूर्व घाट, उत्तराखंड आणि ईशान्येकडील जंगलात आढळतो. हा साप चावल्यानंतर त्या व्यक्तीचा अर्ध्या तासात जीव जातो. किंग कोब्रा एका चाव्यात 200 ते 500 मिलीग्राम विष सोडतो, जे प्रौढ हत्तीला मारण्यासाठी पुरेसे आहे. काही संशोधनात असे आढळून आले आहे की, किंग कोब्रा एका वेळी पीडित व्यक्तीच्या शरीरात 7 मिलीलीटर पर्यंत विष सोडतो.