अहमदाबाद : गुजरात काँग्रेसला लागलेली गळती सुरूच आहे. आज पुन्हा दोन जणांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय.
यामुळे काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या आमदारांची संख्या पाचवर गेलीय. त्यामुळं काँग्रेसकडून राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या अहमद पटेलांसमोरील आव्हान आणखीनच बिकट झालंय.
शंकरसिंह वाघेलांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांचे समर्थक आणि नातेवाईक असलेल्या बलवंदसिंह राजपूत यांच्यासह तीन आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज पुन्हा मानसिंह चौहान आणि सानाभाई चौधरी यांनी राजीनामे दिले आहेत. गुजरातमधील काँग्रेसच्या आमदारांची संख्या आता ५२ पर्यंत खाली आहे.