बंगळुरु : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात तीन उपमुख्यमंत्री असतील. येडियुरप्पा सरकारमधील मंत्र्यांचा आठवडाभरापूर्वी शपथविधी झाला होता. त्यानंतर सोमवारी १७ नव्या मंत्र्यांचं खातेवाटप येडियुरप्पांनी जाहीर केलं. त्यात गोविंद काजरोल, अश्वत्थ नारायण, लक्ष्मण सावाडी हे तीन उपमुख्यमंत्री असतील. त्यापैकी काजरोल यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते व समाजकल्याण, अश्वत्थ नारायण यांना उच्च शिक्षण व माहिती-तंत्रज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान व लक्ष्मण सावडी यांच्याकडे वाहतूक खातं दिलं. यापूर्वी आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन यांच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री आहेत.
कर्नाटकमध्ये नवं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकांना मंत्रीपदाची इच्छा होती. आपल्या नेत्याला मंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांनी देखील आवाज उठवला. त्यामुळे येडियुरप्पा यांच्या समोर मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. पण त्यांना यातून उत्तर काढलं.
मुख्मयंत्री बीएस येडियुरप्पा यांनी सोमवारी विभाग वाटप केला. ज्यामध्ये त्यांनी ३ उपमुख्यमंत्र्यांची घोषणा केली. लक्ष्मण सावाडी यहे सध्या आमदार ही नाहीत आणि विधान परिषदेचे सदस्य देखील नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, सीएम येडियुरप्पा आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यास तयार नव्हते. पण राज्यातील इतर नेत्यांनी असं झाल्यास पक्षात बंड होण्याची शक्यता पक्षश्रेष्ठींकडे वर्तवली.
येडियुरप्पा कॅबिनेटमध्ये लिंगायत समाजाचे ७, ओबीसी समाजाचे २, ब्राह्मन समाजाचा एक, वोक्कालिगा समाजाचे ३ आणि एससी-एसटी समाजाचे ४ जण आहेत. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे देखील लिंगायत समाजाचे आहेत. त्यांच्यासह सरकारमध्ये ८ जण लिंगायत समाजाचे आहेत.
याआधी कर्नाटकाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे नाराज आमदार अरविंद लिंबावली यांच्या समर्थकांनी नारेबाजी केली होती.
कर्नाटकमध्ये भाजपने नलिन कुमार कटील यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं आहे. भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद अशी परंपरा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी या पदाचा राजीनामा दिला. बीएस येडियुरप्पा यांनी २६ जुलै २०१९ रोजी चौथ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.