देशभरात कोरोनाचे ४२२१ रुग्ण, २४ तासात ३५४ नवे रुग्ण : आरोग्य मंत्रालय

२४ तासात कोरोनाच्या ८ रुग्णांचा मृत्यू

Updated: Apr 7, 2020, 06:27 PM IST
देशभरात कोरोनाचे ४२२१ रुग्ण, २४ तासात ३५४ नवे रुग्ण : आरोग्य मंत्रालय title=

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत, देशभरात मागील २४ तासात कोविड-19 (COVID-19) मुळे ८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४२२१ वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ११७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. मागील २४ तासात कोरोनाच्या ३५४ रुग्णांची वाढ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी माहिती दिली की, कोरोनामुळे दिल्ली, मुंबई, भीलवाडा, आग्रा या शहरांमधील छोट्या छोट्या भागांना सील करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. आयसीएमआरने स्पष्ट म्हटलं आहे की, कोरोनाचा रुग्ण जर लॉकडाऊनचं पालन नाही करत आहे तर तो ३० दिवसात ४०६ लोकांना संक्रमित करत आहे." 

लॉकडाउन वाढवण्याबाबत अजून विचार नाही

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे लव अग्रवाल यांनी म्हटलं की, 'लॉकडाउन वाढवण्याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. कृपया शक्यता वर्तवू नका. अफवांवर लक्ष देऊ नका. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. राज्यात जी परिस्थिती आहे त्यानुसार निर्णय घेण्यात येतील. लॉकडाउनबाबत कॅबिनेट सचिव सर्व राज्यांच्या संपर्कात आहेत. लॉकडाउन बाबत जो ही निर्णय होईल त्या बाबत सरकार माहिती देईल.'

अग्रवाल यांनी म्हटलं की, "देशभरात कोरोनाच्या रुग्णांसाठी सेंटर उभारण्यात येतील. भारतीय रेल्वेकडून २५०० कोचमध्ये ४० हजार आयसोलेशन बेड तयार केले आहेत. संपूर्ण देशात १३३ ठिकाणी रोज ३७५ आयसोलेशन बेड बनवले जात आहेत.'