केंद्राचा मोठा निर्णय; जम्मू-काश्मीरच्या काही भागात 4G इंटरनेट सेवा सुरु होणार

जम्मू-काश्मीरमधील निवडक भागात सरकार 4G इंटरनेट सेवा बहाल करणार आहे. 

Updated: Aug 11, 2020, 02:52 PM IST
केंद्राचा मोठा निर्णय; जम्मू-काश्मीरच्या काही भागात 4G इंटरनेट सेवा सुरु होणार title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) 4G इंटरनेट सेवा बहाल करण्यासाठी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टपासून जम्मू-काश्मीरच्या काही भागात 4G इंटरनेट सेवा बहाल करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की, जम्मू-काश्मीरमधील निवडक भागात सरकार 4G इंटरनेट सेवा बहाल करणार आहे. जम्मू-काश्मीरमधील एक-एक जिल्ह्यात ट्रायल म्हणून 4G इंटरनेट सेवा बहाल होईल. त्यानंतर पुढील 2 महिन्यांत याचा आढावा घेतला जाईल.

सीमावर्ती भागात LOCजवळ सध्या 4G इंटरनेट सेवा सुरु करण्यात येणार नाही. दहशतवादी कारवायांच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, कुपवाडा जिल्ह्यात एका शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलाने तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. सेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, सुरक्षा दलानी सोमवारी कुपवाडाच्या लालपोरा भागात संयुक्त शोध मोहीम सुरु केली. यावेळी तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून काही शस्त्रं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.