उत्तर प्रदेशात छेडछाड : ४ कोटींची स्कॉलरशिप मिळवून अमेरिकेत शिकणाऱ्या तरुणीचा रस्ता अपघातात मृत्यू

 उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे छेडछाड काढणाऱ्या मुलीचा अंत झाला.  

Updated: Aug 11, 2020, 12:58 PM IST
उत्तर प्रदेशात छेडछाड : ४ कोटींची स्कॉलरशिप मिळवून अमेरिकेत शिकणाऱ्या तरुणीचा रस्ता अपघातात मृत्यू

बुलंदशहर : आज पुन्हा एक स्वप्न अधुरे राहिले. रस्ता निष्पाप रक्ताने लाल झाला आणि कुटुंबीयांचे मोठे स्वप्न उध्वस्त झाले. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे छेडछाड काढणाऱ्या मुलीचा अंत झाला. अमेरिकेत (USA) सुमारे चार कोटींची शिष्यवृत्ती मिळविणारी सुदीक्षा भाटी या तरुणीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारची आहे. बुलेटवरुन जाणारा एक तरुण सुदीक्षाला ओव्हरटेक करत तिच्या सारखा मागे जात होता. तिला एकप्रकारे तो तरुण त्रास देत होता. याचदरम्यान, सुदीक्षाच्या स्कूटीला अपघात झाला आणि तिचा रस्ता अपघातात मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात सुदीक्षा स्कूटीवर जात होती. त्यावेळी तिच्या स्कूटीचा पाठलाग बुलेटवरुन जाणारा तरुण करत होता. हे तिच्या लक्षात आल्यानंतर तीने स्कूटी पुढे नेली. त्यावेळी तिला ओव्हरटेक करत पुन्हा मागे टाकले. तिच्या मागोमाग जात छेडछाड केली. सातत्याने स्कूटीचा पाठलाग करत तो स्कूटीच्या पुढे आला आणि त्याने अचानक ब्रेक मारला. त्यानंतर सुदीक्षाने स्कूटीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता ती रस्त्यावर आपल्या काकासह खाली पडली. या अपघातात सुदीक्षा भाटी या तरुणीचा मृत्यू.

UP: छेड़खानी के दौरान US में पढ़ने वाली छात्रा की मौत, मिली थी 4 करोड़ की स्कॉलरशिप

गौतम बुधवारच्या दादरी तहसीलच्या दुग्धशाळेतील रहिवासी सुदीक्षा मामाला भेटण्यासाठी तिच्या काकासमवेत सिकंदराबादला जात होता. सुदीक्षा भाटी २० ऑगस्टला अमेरिकेत परत जाणार होती. कोरोनाच्या संसर्गामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात ती अमेरिकेतून परत आली होती. या अपघातात सुदीक्षाचा मृत्यू झाला आणि तिच्या काकांना गंभीर दुखापत झाली.

सुदीक्षाने मोठे स्वप्न पाहिले होते. तिने कठोर परिश्रम करीत अभ्यास केला. स्वत:च्या मेहनतीने आणि हिमतीने अमेरिकेची स्कॉलरशिप मिळवली होती. उच्च शिक्षणासाठी ती सध्या अमेरिकेत गेली होती. परंतु, कोरोना काळात अमेरिकेहून ती आपल्या घरी आली होती. मात्र, नियतीने तिच्यावर काळाची झडप घातली. याला एक तरुण कारणीभूत ठरला. तो तिचा पाठलाग करत होता. तिच्या स्कूटीचा माग काढत त्या तरुणीला त्रास देत होता. याच दरम्यान अचानक बुलेटस्वार तरुणांने आपल्या बाईकचा ब्रेक दाबला. त्यांच्या बाईकची टक्कर सुदीक्षाच्या बाईकशी झाली आणि बाईक घसरली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुदीक्षाने घटनास्थळीच प्राण सोडला.

मेहनतीनं स्कॉलरशिप मिळवून अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या सुदीक्षा भाटीचा करुण अंत झाला. सुदीक्षाच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, सुदीक्षा आपल्या काकांसोबत बाईकवर औरंगाबादला आपल्या मामाच्या घरी निघाली होती. या दरम्यान काही बुलेटस्वार टवाळखोराने त्यांच्या बाईकचा पाठलाग करत सुदीक्षाची छेडछाड सुरु केली. पोलिसांनी सुदीक्षाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवलाय. अज्ञात बाईकस्वारांवर त्यांनी गुन्हा दाखल केलाय. परंतु, या घटनेमुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातल्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. सुदीक्षाचे वडील एक ढाबा चालवतात. सुदीक्षा २० ऑगस्ट रोजी अमेरिकेला परतणार होती. परंतु, त्यापूर्वीच छेडछाडीच्या घटनेत तिला आपले प्राण गमवावे लागले.