नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न

Updated: Sep 27, 2019, 02:23 PM IST
नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा व्हिडिओ व्हायरल

श्रीनगर : भारतीय सेनेने (Indian Army) पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ३० जुलै रोजी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 

नियंत्रण रेषेजवळ (Loc) कुपवाडा सेक्टरमध्ये (Kupwara) झालेल्या घुसखोरीच्या प्रयत्नाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

दहशतवाद्यांच्या या घुसखोरीबाबत भारतीय सेनेला माहिती मिळाली. त्यानंतर भारतीय सेनेकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर भारतीय सेनेने घुसखोऱ्यांना तेथून पळ काढण्यास भाग पाडले. दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय चौक्यांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नांत होते. त्यांचा हा प्रयत्न भारतीय सेनेने हाणून पाडला.