व्हिडिओ : पापणी मिटण्याआधीच कोसळली पाच मजली इमारत

 खचलेली ही इमारत शेजारच्या दोन फुट वाकली होती. अखेर ती कोसळलीच.   

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 10, 2017, 08:02 PM IST
व्हिडिओ : पापणी मिटण्याआधीच कोसळली पाच मजली इमारत title=

नवी दिल्ली : अवैध बांधकाम ही मोठमोठ्या शहरांची मोठी समस्या बनली आहे. बऱ्याचदा हे बांधकाम प्राणघातक ठरते. प्रशासन, बांधकाम व्यावसायिक याच्या संगनमतानेच अशी बांधकामे होतात हेही वारंवार समोर आले आहे.

डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत पाच मजली इमारत कोसळल्याची घटना नवी दिल्लीमध्ये समोर आली आहे. खचलेली ही इमारत शेजारच्या दोन फुट वाकली होती. अखेर ती कोसळलीच. 
 
या धोकादायक इमारतीसंबंधी स्थानिकांकडून तक्रार करण्यात आली होती. एमसीडीने बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी, एमसीडीने ही जागा रिकामी ठेवून इमारत पाडण्यात आली. अमूल अपार्टमेंट नावाची ही इमारत पाडली तेव्हा एका घराचा मोठा भाग कोसळला.

कोसळलेल्या इमारतीचे डेब्रेज जवळच्या नाल्यात गेल्याने नाल्याचे पाणी आजूबाजूच्या घरात शिरले. पाच ते सहा घरांचे यामूळे नुकसान झाले. दरम्यान येथील रहिवाशी बेकायदेशीर बांधकामासंबंधी प्रशासनावर आरोप करीत आहेत. 

एमसीडी अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हे बेकायदेशीर बांधकाम झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.