अहमदाबाद : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांनी विजय मिळवला. तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
मुख्यमंत्री विजय रूपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी, विधानसभेचे सभापती रमन लाल व्होरा विजयी झाले. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष अर्जुन मोढवाडिया, सिद्धार्थ चिमनभाई पटेल आणि राष्ट्रीय प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल यांना पराभव स्वीकारावा लागला.
युवक काँग्रेस नेते परेश धनानी आणि अल्पेश ठाकोर यांनी विजय मिळवला. काँग्रेस समर्थन असलेले अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवानी यांनीही मोठ्या फरकाने विजय मिळवला. भाजपच्या नितीन पटेल यांनी 8,000 मतांनी जिवाभाई अंबालाल या काँग्रेस उमेवदाराला मेहसानामधून पराभवाचा धक्का दिला. राजकोटमधील भाजपचे उमेदवार विजय रुपानी यांनी 53.755 मतांनी इंद्रनील राजगुरू या काँग्रेसच्या अब्जाधीश उमेदवाराला पराभूत केले. दुसरीकडे काँग्रेस नेते गोहिल यांना भाजपच्या वीरेंद्र सिंग जडेज यांना नऊ हजार मतांनी हरवले.
विधानसभा निवडणुकीत गुजरातच्या पाच मंत्र्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यांना काँग्रेस उमेदवारांनी पराभूत केले आहे. गुजरातमध्ये भाजपाला सामान्य बहुमत मिळालं आहे. पाच अपयशींपैकी स्वारम परमार आणि चिमणभाई सप्राय हे कॅबिनेट मंत्री आहेत. भाजपच्या दलित चेहरा असलेले परमार यांना काँग्रेसच्या प्रवीनभाई मारू यांनी 9500 मतांनी पराभूत केले. सपारिया यांना काँग्रेसच्या चिरागभाई कलारिया यांनी पराभूत केले. कलारीया यांना 64,212 तर सपरिया यांना 61,694 मते मिळाली.
गुजरातमधील राज्यमंत्री शंकर चौधरी, केशजी चौहान आणि शारा तडवी हे देखील पऱाभूत झाले. चौधरी यांना काँग्रेसचे उमेदवार जेनीबेन ठाकोर यांनी पराभूत केले. चौधरी यांना 95,673 मते तर ठाकोर यांना 1,02,328 मते मिळाली. भाजपचे उमेदवार चौहाण यांना फक्त 972 मतांनी शिवाभाई भुरिया यांनी पराभूत केले. भुरिया यांना 80,432 तर चौहान यांना 79,460 मते मिळाली. तडवी यांना काँग्रेसच्या प्रेम सिंह वसावा यांनी पराभूत केले. वसावा यांना 81,849 तर तडवी यांना 75,520 मते मिळाली.
विधानसभेचे सभापती रमनलाल वोरा यांना काँग्रेसचे उमेदवार नौशादजी सोलंकी यांच्याकडून दासरा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. सोलंकी यांनी व्होरा यांचा 3,728 मतांनी पराभव केला. दलित समाजातील एक प्रमुख चेहरा म्हणून उदयास आलेले अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवानी यांनी 20,000 मतांनी भाजपच्या विजयकुमार हरखाभाई यांचा पराभव केला.