या राज्यात काँग्रेसला झटका, ६ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

 राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली असताना या राज्यात काँग्रेला झटका लागला आहे.

Updated: Jul 30, 2020, 04:02 PM IST
या राज्यात काँग्रेसला झटका, ६ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश  title=

इम्फाळ: राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली असताना इम्फाळ महानगरपालिकेतील काँग्रेसचे ६ तर नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) एका नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह आणि भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. 

मुख्यमंत्र्यांनी या सर्व नगरसेवकांचं पक्षात स्वागत केलं. राज्यातील भाजप सरकारच्या चांगल्या कामांमुळे नगरसेवक भाजपमध्ये आल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी लवकरच आणखी काही नेते भाजपमध्ये येतील असा दावा केला आहे. २७ सदस्य संख्या असलेल्या इम्फाळ महानगरपालिकेत काँग्रेसचे १२, भाजपचे १०, अपक्ष ४ तर एनपीपीचा एक नगरसेवक आहे. काँग्रेसने ४ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. काँग्रेसचे एल. लोकेश्वर इम्फाळ महानगरपालिकेचे महापौर आहेत. पण ६ नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसची सत्ता संकटात सापडली आहे.