चिमुरडींवर बलात्कार, ५-५ रुपये देऊन केलं चिडीचुप

मुली रडल्यानंतर त्याने पाच-पाच रुपये देऊन घटनेबद्दल कुठे वाच्यता न करण्यास सांगितले.   

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 29, 2017, 03:37 PM IST
चिमुरडींवर बलात्कार, ५-५ रुपये देऊन केलं चिडीचुप title=

नवी दिल्ली : अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणी ६० वर्षाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या पालममध्ये ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

मिठाईची लालच 

फर्स्ट पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, मुलींकडून मिळालेल्या माहितीनुसार शेजारी राहणाऱ्या इसमास पोलिसांनी अटक केली आहे.

पाच आणि नऊ वर्षाच्या दोन मुलींना मिठाई देण्याच्या लालचेने त्याने आपल्या घरी बोलावले होते. 

पाच-पाच रुपये

मुली रडल्यानंतर त्याने पाच-पाच रुपये देऊन घटनेबद्दल कुठे वाच्यता न करण्यास सांगितले.   

आईवडिलांना सांगितले 

मुलींनी घडलेली घटना आपल्या आईवडिलांसमोर कथन केली.  त्यानंतर आईवडिलांनी पोलिसांत तक्रार केली.

ही घटना रविवारी घडली असून आरोपी विरोधात तक्रार लिहून घेतल्याचे पोलीस उपायुक्त मिलिंद माहदेव दंबेरे यांनी सांगितले.