नवी दिल्ली : देशात कोरोनाव्हायरचा कहर सुरुच आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता 78 हजार 3 झाली आहे. त्यापैकी 49 हजार 219 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर पूर्णपणे निरोगी असलेल्या एकूण 26 हजार 235 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. तर मृतांचा आकडा 2549 वर पोहोचला आहे.
गेल्या 24 तासांत 3722 रुग्ण वाढले असून 134 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 25 हजार 922 पर्यंत वाढली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्याही 975 वर गेली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतो आहे.
दुसरीकडे गुजरातमधील संसर्गही चिंतेचा विषय आहे. येथे 8 हजार 903 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी राज्यात 537 जणांचा मृत्यू झाला आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्ली कोरोनाचा रुग्णांची संख्या 7639 वर पोहोचली असून 86 जणांचा मृत्यू झाला आहे.