7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार कधी वाढणार? 34% DA वाढीबाबत अपडेट

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्यांचा निर्देशांक सरासरी 351.33 आहे. या सरासरी निर्देशांकावर 34.04% महागाई भत्ता दिला जातो. याबाबत कधी निर्णय घेतला जाईल ते जाणू घ्या

Updated: Feb 22, 2022, 10:20 AM IST
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार कधी वाढणार? 34% DA वाढीबाबत अपडेट title=

मुंबई : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होळीपूर्वी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा होऊ शकते. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळातही सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली होती. यावेळीही सणासुदीच्या काळात सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते.

3% ची वाढ निश्चित

अनेक दिवसांच्या मागणीनंतर, आता महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता  मिळेल. औद्योगिक कामगारांसाठी डिसेंबर 2021 च्या ग्राहक किंमत निर्देशांकात एका अंकाची घट झाली आहे.

कधी जाहीर होईल ते जाणून घ्या

सध्या कर्मचाऱ्यांना सध्या 31 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारी 2022 पासून 3% अधिक महागाई भत्त्याचा लाभ मिळू शकेल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, मूळ वेतनावरच महागाई भत्ता दिला जातो.

मार्चमध्ये त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे सरकार तत्काळ घोषणा करू शकत नाही.