7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आणखी एका भत्त्याची वाढ; इतका वाढणार पगार

7th Pay Commission latest news: केंद्रीय कर्मचार्यांना या महिन्यात खुशखबर मिळू शकते. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ (Dearness allowance) होणार आहे.

Updated: Jan 17, 2022, 10:18 AM IST
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आणखी एका भत्त्याची वाढ;  इतका वाढणार पगार title=

मुंबई :7th Pay Commission latest news: केंद्रीय कर्मचार्यांना या महिन्यात खुशखबर मिळू शकते. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ (Dearness allowance) होणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. कोरोना काळात अडकलेल्या डीएमध्ये वर्ष 2021 मध्ये वाढ झाली होती. तसेच दुसरीकडे साधारण तीन वर्षापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरबाबत होणाऱ्या मागणीबाबत केंद्र सरकारचा निर्णय येऊ शकतो. 

पुन्हा वाढणार कर्मचाऱ्यांचा पगार
जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर (Fitment factor) वाढला तर, त्यांची बेसिक सॅलरी वाढू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार ते 2.57 वरून 3.68 देखील होऊ शकते. दुसरीकडे महागाई भत्ता देखील वाढणे निश्चित मानले जात आहे. AICPI चे नोव्हेंबरचे आकडे आले आहेत. त्यानुसार 2 ते 3 टक्के डीए वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांनी डिसेंबरचेही आकडे येतील. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 31 टक्के महागाई भत्ता (DA Hike) मिळत आहे. जर या महिन्यात 2 % वरून 3% वर वाढ होत असेल. तर कर्मचाऱ्यांना 33 ते 34 टक्के डीए मिळू शकतो. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल.