जे हवं होतं तेच... 8th Pay Commission संदर्भातील मोठी बातमी

8th Pay Commission : मोदी सरकारमुळं Government Job करणाऱ्यांची चांदी... पाहून घ्या नेमका कधी वाढणार पगार... आणि किती टक्क्यांनी होणार पगारवाढ   

सायली पाटील | Updated: Jun 19, 2024, 03:06 PM IST
जे हवं होतं तेच... 8th Pay Commission संदर्भातील मोठी बातमी title=
8th Pay Commission Proposal Sent To PM Modi Govt Urged To Revise Pay Allowances latest update

8th Pay Commission : वाढत्या महागाईच्या झळा पाहता बऱ्याच संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ करण्यात येत असल्याचं चित्र मागील काही वर्षांमध्ये पाहायला मिळालं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनाही या बाबतीत केंद्रस्थानी ठेवलं जात असून, याच धर्तीवर येत्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 वा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याच्या घडामोडींना वेग आला आहे. 

आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन, भत्ते आणि इतर भत्त्यांच्या सर्व अपेक्षा या निर्णयामुळं लवकरच पूर्ण होतील. अशा स्वरुपाचा प्रस्ताव आता आयोगाने सरकारकडे पाठवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा केंद्रात भाजप आणि एनडीएची सत्ता आली. ज्यानंतर या सरकारचा अर्थात मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प लवकरच सादर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आठव्या वेतन आयोगाने हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे.

हेसुद्धा वाचा : अभिषेक बच्चननं मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घेतले 6 आलिशान फ्लॅट; किंमत पाहून चक्रावून जाल... 

विशेष म्हणजे, या प्रस्तावानुसार मूळ वेतन, सरकारी भत्ते आणि निवृत्ती वेतनासह इतर भत्त्यांचंही तपशीलवार विश्लेषण करण्यात आलं आहे. अर्थातच या सर्वांचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांसह निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.  केंद्रीय कर्मचारी कल्याणासाठी काम करणाऱ्या आयोगाचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी यासंदर्भातील एक पत्र केंद्रीय सचिवांना पाठवले असून यामध्ये तातडीने आठवा वेतन आयोग स्थापित करण्याची विनंती करण्यात आली आहे.

8th Pay Commission लागू झाल्यास किंवा फिटमेंट फॅक्टर काही टक्क्यांनी वाढल्यास केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती वाढणार हे उदाहरणासह पाहून घ्या. सध्याच्या घडीला केंद्र सरकारच्या अख्तयारित येणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टर देण्यात येतो. ज्यानुसार कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 18000 रुपये इतकं आहे. थोडक्यात यावेळी समजा कर्मचाऱ्यांच्या वेतनात 3.68 टक्क्यांचा फिटमेंट फॅक्टर असेल, तर किमान मूळ वेतन 44 टक्क्यांनी म्हणजेच 8 हजार रुपयांनी वाढून थेट 26000 रुपयांवर जाईल.