Couple Romance on Biike Video: सध्या संपूर्ण देशभरात व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जात असताना राजस्थानमधील अजमेर येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रेमी युगूल धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांची ओळख पटवत चौकशी केली आहे. तसंच त्यांची बाईक जप्त केली आहे.
Couple Romance on Biike Video: लखनऊ (Lucknow) आणि छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) दुचाकीवर रोमान्स (Romance on Bike) केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. सोमवारी येथील रिजनल कॉलेज चौकात एक प्रेमी युगुल बाईकवर रोमान्स करताना दिसलं. घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर मंगळवारी अजमेरच्या ख्रिश्चियन गंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या (CCTV) आधारे दुचाकीवर स्वार तरुण आणि तरुणीची ओळख पटवली आहे. साहिल मैसी असं या २४ वर्षीय तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावत दोघांची चौकशी केली. तसंच दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
करण सिंग खंगारोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कलम 336 (जीव धोक्यात घालणं), 279 (बेजबाबदारपणे वागणं), 294 (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. गुन्हा सिद्द झाल्यानंतर कायद्यानुसार तरुण आणि तरुणीविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
या व्हिडीओत तरुण बाईक चालवताना दिसत आहे. यावेळी तरुणी बाईकच्या टाकीवर उलट्या दिशेने तोंड करुन बसली होती. दोघेही अजमेर येथून पुष्करच्या दिशेने चालले होते. या घटनेची शहरात चर्चा सुरु आहे.
याआधी 21 जानेवारीला छत्तीसगडच्या भिलाई येथे धावत्या बाईकवर रोमान्स करणं एका प्रेमी युगुलाला चांगलंच महागात पडलं होतं. प्रेमी युगुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे दुचाकीवर स्वार प्रेमी युगुलाला बेड्या ठोकल्या. दुचाकीवर उलट्या दिशेला तोंड करुन बसलेली मुलगी तरुणाला किस करताना व्हिडीओत दिसत होती.
उत्तर प्रदेशातील लखनऊतही अशीच घटना घडली होती. 17 जानेवारीला राजधानी लखनऊमधील हजरतगंज येथील एका तरुण आणि तरुणीचा स्कुटीवर रोमान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. व्हिडीओत तरुणी तरुणाच्या मांडीवर बसून त्याला किस करत असल्याचं दिसत आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी तरुणाला अटक केली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिची काही माहिती शेअर केली नव्हती.