viral wedding flight video: हल्ली अनेक प्रकारचे लग्नाचे व्हिडीओ हे व्हायरल (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही गंमत वाटत राहते. कधी कधी हे व्हिडीओ (video) इतके तूफान व्हायरल होतात की आपल्यालाही ते पाहून पोटभर हसल्याशिवाय आपला जीव शांत होत नाही. इंटरनेट (internet) सर्वाधिक व्हायरल होणारे व्हिडीओज म्हणजे लग्नातील लोकांचे तूफान डान्स (viral dance video and music videos) आणि संगीत. लग्नातले विचित्र डान्स पाहून तर आपल्याला हास्याच्या उकळ्या फुटू लागतात. परंतु सध्या असाच एक व्हिडीओ (videos) सोशल मीडियावर (social media) तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तुम्हीही हा व्हिडीओ (video) पाहिलाच हवा.
सध्या भारतीय लग्नसोहळे हे प्रचंड खर्चिक आणि भव्यदिव्य (expensive videos) होताना दिसतात. इतके की पाश्चात्त्य लग्नसोहळेही त्याच्यापुढे फिके दिसू लागतील. लग्नसोहळ्यात पोशाख, साडी, दागिने, जेवण आणि सजावट यांची नुसती चंगळ असते. पाहुण्यांची यादी तर इतकी मोठी असते की त्यात राहून नाही ना गेलं याची कुटुंबियांना आणि नवरदेवासह (bridegroom and bride) नवरीलाही चिंता लागून राहिलेली असते. आपल्या कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या लग्नात हजेरी लावावी अशा प्रत्येकाचीच इच्छा असते त्यामुळे आपण लग्नासाठी योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न करत असतो.
प्रत्येकजण आपला लग्नसोहळा किती आनंदात आणि भव्यदिव्य कार्यक्रमाप्रमाणे होईल याचा विचार करत त्याप्रमाणे वेडिंग प्लॅनिंग (wedding planning) करत असतो. कोविड महामारीमुळे (covid) गेल्या दोन वर्षांपासून लोकं लग्नाच्या धुमधामीचाही नीट आनंद घेऊ शकले नव्हते. कुठेही जास्त मोठ्या प्रमाणात आलिशान कार्यक्रम आयोजित केले जात नव्हते. आता सगळंच सुरू झाल्यानं डेस्टिनेशन वेडिंगला (destination wedding) पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे.
अशाच एका डेस्टिनेशन वेडिंगमध्ये एका जोडप्याने आपल्या कुटुंब आणि नातेवाईकांसह लग्नाला जाण्यासाठी अख्खी फ्लाईट (flight) बुक केली. इंस्टाग्राम (instagram) युजर श्रेया शाहने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये युजर्सनी कमेंट केले आहे की व्वा क्या बात हैं आपल्या बहिणीच्या लग्नासाठी संपूर्ण फ्लाइट बुक केली? श्रेया शाहने शेअर केलेल्या या व्हिडीओत संपुर्ण कुटुंब फ्लाईटमध्ये आनंद घेताना दिसत आहेत. व्हिडीओच्या (wedding flight video) शेवटी लग्नात अडकणारे जोडपेही दिसत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक लोकप्रिय पंजाबी गाणे ऐकू येत आहे. हे लग्न राजस्थानच्या जैसलमेरला होणार आहे.
या व्हिडिओ क्लिपसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, 'लेस्ट्स रोल इट, गेस करा आम्ही लग्नासाठी कुठे जात आहोत?' हा व्हिडिओ तीन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता आणि शेअर केल्यापासून त्याला 10.2 दशलक्ष व्ह्यूज आणि सात लाखांहून अधिक लाईक्स (likes) मिळाले आहेत.