Uttar Pradesh: लखनऊमधील हजरतगंज येथील हॉटेलला आग; पाहा Video

लखनऊमधील हजरतगंज येथील एका हॉटेलला आग लागल्याची घटना घडली आहे . या घटनेनंतर हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

Updated: Sep 5, 2022, 09:30 AM IST
 Uttar Pradesh: लखनऊमधील हजरतगंज येथील हॉटेलला आग; पाहा Video   title=

 Uttar Pradesh: लखनऊमधील हजरतगंज येथील एका हॉटेलला आग लागल्याची घटना घडली आहे .  हे हॉटेल लखनऊच्या हजरतगंज भागात आहे. लेवाना हॉटेलला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. हॉटेलच्या खोल्यांमध्ये अनेक लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर आगीमध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याचं देखील कळत आहे. अद्याप जीवितहानीबाबत माहिती समोर आलेली नाही.

 

मात्र हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना खिडक्या तोडून बाहेर काढण्यात येत आहे. यावेळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मदतकार्य सुरु आहे. लेवाना हॉटेल लखनऊमधील सर्वात उच्चभ्रू भागात असलेल्या हजरतगंजमध्ये आहे. लखनौ रेल्वे स्टेशनपासून ते फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे.

याच हॉटेलजवळ हजरतगंज मेट्रो स्टेशन देखील आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार हॉटेलला लागलेली आग खूप गंभीर आहे. हॉटेलमध्ये बरेच लोक आहेत. आपत्कालीन एक्झिट तोडून लोकांना बाहेर काढले जात आहे.

याशिवाय लोकांना बाहेर काढण्यासाठी हॉटेलच्या खिडक्यांच्या काचाही तोडण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जळालेल्या लोकांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या आहेत. यादरम्यान हॉटेलला लागलेल्या आगीच्या धुरामुळे गुदमरल्यानं अनेक जण बेशुद्ध झाल्याचं सांगण्यात येत आहे.