आईच्या प्रियकरानेच केला बलात्कार, घरी एकटी असताना गाठलं अन् धमकावत...; कुटुंब हादरलं

29 वर्षीय तरुणाने लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आपल्या जोडीदाराच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 18, 2024, 11:46 AM IST
आईच्या प्रियकरानेच केला बलात्कार, घरी एकटी असताना गाठलं अन् धमकावत...; कुटुंब हादरलं title=

दिल्लीत 14 वर्षीय मुलीवर तिच्याच आईच्या प्रियकराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 23 जुलैला बुरारी भागात ही घटना घडली आहे. अंकित यादव असं या आरोपीचं नाव असून तो गाजियाबादच्या लोणी भागातील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आयपीसीच्या संबंधित कलम आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

आरोपी बसचालक असून कंत्राटी पद्धतीवर काम करतो. पीडित मुलीच्या आईसोबत तो मागील 8 वर्षांपासून काम करत होता. महिलेला या नात्यातून एक मुलगाही झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला 23 जुलैला मुलांना घरात ठेवून बाहेर गेली होती. आरोपी अंकितने मुलं घरी एकटे असल्याचा फायदा घेतला आणि मुलीवर बलात्कार केला. आरोपीने यावेळी मुलीला धमकावलं होतं. तसंच वारंवार त्याची पुनरावृत्ती केली होती. 

महिलेला आधीच्या लग्नापासून तीन मुलं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई सुरु कऱण्यात आली. 

पीडितेची वैद्यकीय तपासणी तसंच समुपदेशन करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 (बलात्कार), आणि 506 (गुन्हेगारी धमकी) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.