छेडछाडीची शिकार : शुद्धीकरणाच्या नावाखाली समाजाचा घाणेरडा प्रकार

छत्तीसगडमधील कवर्धा जिल्ह्यात छेडछाडीचा प्रकार घडला. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 13, 2018, 12:38 PM IST
छेडछाडीची शिकार : शुद्धीकरणाच्या नावाखाली समाजाचा घाणेरडा प्रकार  title=

रायपुर : छत्तीसगडमधील कवर्धा जिल्ह्यात छेडछाडीचा प्रकार घडला. 

या आदिवासी मुलीच्या शुद्धिकरणासाठी समाजाने तिच्यासोबत जो प्रकार केला तो धक्कादायक होता. पोलिसांनी छेडछाड केलेल्या आरोपीला पकडलं असून समाज कंठक मात्र फरार आहेत. 13 वर्षाच्या आदिवासी मुलीसोबत छेडछाड झाली म्हणून तिला शुद्ध करण्याच्या हेतून समाजातील काही लोकांनी तिचे चक्क केस कापले. 

काय आहे हा प्रकार? 

कवर्धा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी लाल उमेद सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्या मुख्यालयापासून अगदी 75 किमी अंतरावर हा प्रकार घडला. यामध्ये 13 वर्षाच्या आदिवासी मुलीचे समाजाने केस कापले. छेडछाड करणारा 22 वर्षीय आरोपी अर्जुन यादव याला अटक करण्यात आली आहे. या केस कापण्याच्या प्रकरणावरून 10 लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

छेडछाड करणाऱ्या तरूणावर 5 हजाराचा दंड 

सिंह यांनी सांगितलं की, गेल्या महिन्यात 21 तारखेला सेंदूरखार गावात काम करताना आरोपी अर्जुन यादव या तरूणाने केली छेडछाड. याची माहिती या मुलीने आपल्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर 22 तारखेला पंचायत बोलवून त्याला 5 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला.