महाशिवरात्रीचा उत्सवानिमित्ताने देशभरात भाविकांमध्ये उत्साह

देशभरात महाशिवरात्रीचा उत्सवानिमित्ताने भाविकांमध्ये शिवभक्तीचं उधाण आलंय. हरिद्वारपासून उज्जैनपर्यंत. सर्वत्र हरहर महादेवचा गजर दुमदुमत आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 13, 2018, 07:42 AM IST
महाशिवरात्रीचा उत्सवानिमित्ताने देशभरात भाविकांमध्ये उत्साह title=

नवी दिल्ली : देशभरात महाशिवरात्रीचा उत्सवानिमित्ताने भाविकांमध्ये शिवभक्तीचं उधाण आलंय. हरिद्वारपासून उज्जैनपर्यंत. सर्वत्र हरहर महादेवचा गजर दुमदुमत आहे. 

सकाळी उज्जैनच्या महाकालेश्वरावर भस्माचा अभिषेक करण्यात आला. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या महाकालेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ लागली. शिवभक्तांचा बम बम भोले आणि ओम नमः शिवायचा गजर साऱ्या देशात सुरु आहे.

हिंदू धर्मात महाशिवरात्रीला मोठं महत्त्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त देशभर शिव मंदिरात जाऊन भाविक शिवलिंगावर अभिषेक करतात. महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांनी मुंबईतील बाबुलनाथमध्ये दर्शनासाठी गर्दी केलीये. रात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात.पहाटे शिवलिंगाची महापूजा आणि अभिषेक करण्यात आला.

बाबूलनाथ मंदिरात अभिषेक करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. दरवर्षी महाशिवरात्रीला याठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदाही भाविकांनी बाबूलनाथ मंदिरात दर्शनासाठी करण्यासाठी चांगलीच गर्दी केली आहे.