आयुष्य काटेरी असतं पण त्या काट्यांनीच त्याचा जीव वाचवला, पाहा....

पुराच्या पाण्यात ( flood) अडकलेल्या व्यक्तीनं काटेरी झुडपांचा आधार घेत जगण्याचा संघर्ष जिंकला. 

Updated: Jul 27, 2021, 11:02 PM IST
आयुष्य काटेरी असतं पण त्या काट्यांनीच त्याचा जीव वाचवला, पाहा....

बेळगाव : बेळगाव (Belgaum Flood) जिल्ह्यात पूरपरिस्थिती अतिशय गंभीर आहे. अशा परिस्थिती एका व्यक्तीच्या जगण्याचा संघर्ष पाहायला मिळाला. जिथं पूराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीनं काटेरी झुडपांचा आधार घेत जगण्याचा संघर्ष जिंकला. (A person trapped in a flood in Belgaum survived due to a thorny tree)

पुराच्या पाण्यात अडकलेल्या या व्यक्तीनं बाहेर येताच जीव वाचवणाऱ्यांच्या पायाशी लोटांगण घातलं. असं म्हणतात आयुष्य काटेरी असतं. पण याच काट्यांनी पुरात अडकलेल्या या व्यक्तीचा जीव वाचवला. मनाचा ठाव घेणारी ही दृश्य पाहून नकळतच सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओलावत आहेत. एकिकडे थरकाप उडवणारी दृश्य पुराची भीषणता दाखवतात, तर दुसरीकडे आशेच्या एका किरणावर टिकलेल्या आयुष्याचं सार सांगतात.