खासदाराच्या पत्नीचा गौप्यस्फोट, एका बड्या नेत्याच्या मुलाने माझा विनयभंग केला

एका बड्या नेत्याच्या मुलाने माझा विनयभंग केला, असा धक्कादायक गौप्यस्फोट खासदाराच्या पत्नीने केला आहे.

Jaywant Patil Updated: Mar 17, 2018, 09:40 PM IST
खासदाराच्या पत्नीचा गौप्यस्फोट, एका बड्या नेत्याच्या मुलाने माझा विनयभंग केला

कोट्टायम : एका बड्या नेत्याच्या मुलाने माझा विनयभंग केला, असा धक्कादायक गौप्यस्फोट खासदाराच्या पत्नीने केला आहे. केरळ काँग्रेसचे खासदार के. जोश मणी यांच्या पत्नी निशा जोश यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांच्यासोबत घडलेल्या या घटनेबद्दल लिहलं आहे. धक्कादायक बाब ही आहे की त्यांचा विनयभंग एका बड्या नेत्याच्या मुलाने केला होता, असं त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे. मात्र त्याचं नाव निशा जोश यांनी लिहिलेलं नाही.

रेल्वेमध्ये या व्यक्तीने केला विनयभंग

निशा यांनी सांगितलं लिहिलंय की, ट्रेनने त्रिवेंद्रमला जात असताना निशा यांच्या डब्यामध्ये त्यांचा विनयभंग करणारी व्यक्तीही होती. आपण आपल्या सासऱ्यांना बघायला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हा माणूस चिपकून बसला

ट्रेनमध्ये प्रवास करताना, निशा या दमल्या असल्याने त्यांना झोपायचं होतं. त्या त्यांच्या रिझर्व्ह लोअर बर्थवर झोपल्या, मात्र हा माणूस त्यांना चिपकून बसला आणि त्यांच्या पायाला स्पर्श करत होता.

टीसीला ओढवून घ्यायचा नव्हता रोष

निशा यांनी त्यांना, आपल्याला झोपायचं आहे, असं सांगितलं, पण तो उठला नाही, आणि संपूर्ण प्रवास आपण प्रचंड दबावात आणि अवघडलेल्या अवस्थेत केल्याचं निशा यांनी म्हटलंय. टीसीला तक्रार करूनही काहीही फायदा झाला नाही, कारण टीसीला राजकारण्यांचा उगाच रोष ओढवून घ्यायचा नव्हता असं निशा यांनी म्हटलं आहे.

महिलांवर अनेकदा घाणेरडी शेरेबाजी

कुठेही प्रवास करत असताना अनेकवेळा, महिलांवर अश्लील शेरेबाजी, विनयभंगाला समोरं जावं लागतं. धावत्या ट्रेनमध्ये महिलांवर बलात्कार झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. हा अनुभव सर्वसामान्य महिलांप्रमाणे एका खासदाराच्या बायकोलाही आला हे विशेष.