एका विचित्र घटनेने पोलिसांसोबत परिसरात लोकांची झोप उडाली. 3 मुलांची आई असलेल्या महिलेसाठी जेव्हा दोन नवरे भांडायला लागले. हो पोलिसांसमोर एका महिलवर दोन नवऱ्यांनी आपली पत्नी असलाचा दावा केला. हा हाय व्होल्टेज ड्रामा घडला बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनमध्ये. पहिला म्हणाला ती माझी बायको आहे, तर दुसऱ्यानेही आपण तिचा नवरा असल्याचा दावा केला. बराच काळ हा ड्रामा पोलीस स्टेशनमध्ये रंगला. पोलिसांना यावर मार्ग सापडत नव्हता. (A woman who is a mother of 3 children is claimed by 2 husbands The police were also confused finally the woman)
या महिलेला तीन मुल असून 8 आणि 20 वर्षांची दोन मुलं आणि 13 वर्षांची मुलगी आहे. पोलिसांनी दोन्ही व्यक्ती म्हणून ऐकून घेतलं. त्यानंतर पोलिसांचा तपास सुरु झाला. या दोघांमधील एकाच नाव राम प्रसाद महतो होता. तो मुझफ्फरपूर जिल्ह्यातील सकरा पोलीस स्टेशन हद्दीतील बखरी गावातील राहत होता. राम याच लग्न 22 वर्षांपूर्वी साक्रामधील मझौली गावात झालं होतं. लग्नानंतर त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी झाली.
पण पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार या दोघा नवरा बायकोमध्ये 2018 साली वाद झाला होता. त्यावेळी पत्नी आपल्या 5 वर्षाच्या मुलीसह घर सोडून निघून गेल्याचा माहिती समोर आली. ती हाजीपूरला गेली आणि तिथल्या एका कंपनीत काम करू लागली.
त्यानंतर पोलिसांच्या असं समोर आलं की, ही महिला कुधणीमधील ढोढ़ी गावात राहणाऱ्या बथू राय यांच्या पत्नीला भेटली. तिथून ती तिच्यासोबत ढोढ़ी आली आणि काही दिवसांनी ती जवळच्या गोरौलमधील चैनपूर भटौलिया गावातील रहिवासी हरेंद्र राय याच्यासोबत राहायला लागली.
राम प्रसाद याने पोलिसांना सांगितलं की, तो सात वर्षांपासून सतत पत्नीचा शोध घेत होता. ती भटौलिया गावात राहत असल्याची माहिती गेल्या तो तिथे तिला घ्यायला आला. याबाबत पोलिसांना माहिती देऊन महिला आणि तिच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं. गंमत म्हणजे दोन्ही पती महिलेसोबत नांदण्यासाठी पोलिसांसमोर वाद घालत होते. आता यातून मार्ग कसा काढायचा तर अखेर महिलेनेच निर्णय घेतला. महिलेनं आपल्या पहिल्या पतीसोबतच संसार करायचा निर्णय घेतला आणि ती दुसऱ्या पतीला सोडून पहिल्या पतीसोबत निघून गेली.
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 154/7
|
VS |
BRN
157/4(16.2 ov)
|
Bahrain beat Tanzania by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.