नवीन आधार कार्ड बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; UIDAIने दिली माहिती

UIDAIने आधार बनवण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. युआयईडीएआयने माहिती दिली आहे की, बाळाच्या जन्माच्या प्रमाणपत्रावर किंवा रुग्णालयातील डिस्चार्ज स्लिपवरून आई-वडिल आपल्या बाळाच्या आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. 

Updated: Sep 23, 2021, 03:20 PM IST
नवीन आधार कार्ड बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; UIDAIने दिली माहिती title=

नवी दिल्ली : UIDAIने आधार बनवण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. युआयईडीएआयने माहिती दिली आहे की, बाळाच्या जन्माच्या प्रमाणपत्रावर किंवा रुग्णालयातील डिस्चार्ज स्लिपवरून आई-वडिल आपल्या बाळाच्या आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. 

निळ्या रंगाचा वेरिएंट
आधार कार्डचा निळ्या रंगाचा वेरिएंट 5 वर्षाखालील बालकांसाठी जारी करण्यात येतो. परंतु नवीन नियमांनुसार 5 वर्षाखालील बालकांसाठी कोणत्याही प्रकारच्या बायोमॅट्रिक डिटेलची आवश्यकता नसणार आहे. परंतु बालकांचे वय 5 वर्षाहून अधिक झाल्यास बायोमॅट्रिक अपडेट करणे गरजेचे असणार आहे.

प्रक्रिया
1 बाल आधार बनवण्यासाठी UIDAIच्या वेबसाईटवर लॉग ऑन करा
2 येथे आधार कार्ड रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडा
3 यामध्ये आवश्यक माहिती जसे की, बाळाचे नाव वेगैरे भरा
4 आता रहिवासी पत्ता. राज्य, इत्यादी माहिती भरा
5 आधार कार्ड रजिस्टेशन करण्यासाठी निर्धारित करण्यासाठी 'Appointment'पर्यायावर क्लिक करा
6 जवळचे एनरोलमेंट केंद्र निवडा, तुमची appointment निश्चित करा. त्यावेळी केंद्रात पोहचा.

केंद्रात पोहचल्यानंतर संबधित अधिकारी कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. जर बाळ 5 वर्षावरील असेल तर बायोमॅट्रीक डेटादेखील घेतला जाईल. पुढील 60 दिवसांच्या आत रजिस्टर मोबाईल नंबरवर SMS मिळेल. त्यानंतर 90 दिवसात आधारकार्ड घरी येईल.