'आप'ला हादरा, आमदाराचा भाजपात प्रवेश

दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा झटका बसलाय.  

Updated: May 3, 2019, 08:50 PM IST
'आप'ला हादरा, आमदाराचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा झटका बसलाय. गांधी नगर मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार अनिल बाजपयी यांनी भाजपात प्रवेश केलाय. या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर आपच्या नेत्यांना पैसे दिल्याचा आरोप केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी भाजपवर घोडेबाजारचा आरोप केला होता. भाजप दुसऱ्या पक्षांमधील आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते. 

केजरीवाल यांच्या आरोपानंतर शुक्रवारी आम आदमी पक्षाचे आमदार अनिल वाजपेयी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वाजपेयी यांनी भाजपचे उपाध्यक्ष आणि दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष श्याम जाजू आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. 

भाजपमध्ये प्रवेश केलेले वाजपेयी म्हणालेत, मला पक्षात आदर मिळाला नाही. मी १५ वर्ष आम आदमी पक्षासाठी काम केले. मात्र, पक्षात मला आदर मिळत नव्हता. एकाच व्यक्तीच्याभोवती पक्ष चालतो, तो भरकटलेला पक्ष आहे. त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.